महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kanak Rele passed away : शास्त्रीय नृत्यांगना कनक रेळे यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी लिहिली भावनिक पोस्ट - classical dancer Kanak Rele

शास्त्रीय नृत्यांगना कनक रेळे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मोहिनीअट्टयम नृत्यात पारंगत होत्या. मुंबईत नालंदा ही कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण देणारी नामवंत संस्था सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कनक रेळे यांच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Feb 23, 2023, 12:35 PM IST

मुंबई - प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना कनक रेळे यांचे बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. भाजप खासदार आणि प्रसिद्द अभिनेत्री हेमा मालिनी यांनी ही बातमी सोशल मीडियावरुन दिली आहे.

हेमा मालिनी यांची भावनिक पोस्ट - बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी बुधवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दिवंगत नर्तक कनक रेळेसोबतचा स्वतःचा फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिलं की, 'आम्हा सर्वांसाठी व खास करुन माझ्यासाठी हा एक अतिशय दुःखाचा दिवस आहे. मझ्यासाठी हे खूप मोठे नुकसान आहे. माझ्यात आणि कनक रेळे यांच्यात खूप आदर होता. पद्मविभूषण डॉ. कनक रेळे या मोहिनीअट्टम नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शक आणि नालंदा नृत्य संशोधन केंद्राचे संस्थापक होत्या. त्यांच्या निधनाने शास्त्रीय नृत्याच्या विश्वासाठी एका महान युगाचा अंत झाला आहे. या कलेच्या विश्वात त्यांचे योगदान मोठे राहिले आहे. कनक जींचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्व शाश्वत आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि नालंदामधील सदस्यांप्रती माझ्या हार्दिक संवेदना. आमची मैत्री माझ्याकडून नेहमी जपली जाईल.'

मोहिनीअट्टयम नृत्यात पारंगत कनक रेळे- डॉ. कनक रेले केरळच्या लोकप्रिय मोहिनीअट्टयम नृत्यात पारंगत होत्या. या माध्यमातून त्यांनी जगभरात आपल्या कलेचा अमिट ठसा उमटवला. त्यांनी शास्त्रीय नृत्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले ज्याचे संपूर्ण श्रेय त्यांना दिले जाते. यासोबतच कोरिओग्राफर म्हणूनही कनक रेळे यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता.

कनक रेळे यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव - एएनआय या वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कनक रेले यांना त्यांच्या 8 दशकांच्या नृत्य कारकिर्दीत भारत सरकारकडून अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना आजवर पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह कालिदास सन्मान, एम.एस. सुब्बुलक्ष्मी पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

नृत्याला समर्पित 'नालंदा’ उभारणी- डॉ. कनक रेळे यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरू पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. मोहिनीअट्ट्म नृत्यप्रकाराचे विशेष प्रशिक्षण त्यांना कलामंडलम्‌ राजलक्ष्मी या विदुषींकडून मिळाले होते. डॉ. कनक रेळे गेल्या अनेक वर्षांपासून नृत्यशिक्षणाचे काम अविरत करीत होत्या. त्यासाठी त्यांनी मुंबईत इ.स. १९६६ साली ’नालंदा डान्स अँन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या. 'नालंदा’ ही नृत्याला समर्पित संस्था उभी करण्यासाठी त्यानी खूप मेहनत घेतली होती.

हेही वाचा -Pathan Collected 500 Crores In Hindi : पठाणचा हिंदीत ५०० कोटींचा गल्ला, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने ही दिली प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details