मुंबई- अॅन अॅक्शन हिरो या चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुरुवारी प्रशंसित अभिनेता आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत यांच्या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केले. टी-सीरीज आणि आनंद एल राय निर्मित, हा चित्रपट आयुष्मानची त्याच्या कारकिर्दीतील पहिली अॅक्शन-पॅक भूमिका आहे. उपहासात्मक विनोदाची झकास किनार असलेला हा चित्रपट एका अॅक्शन हिरो कलाकाराची रोमांचक कथा सांगताना दिसत आहे.
आतापर्यंत, चित्रपटाबद्दल खूपच सकारात्मक चर्चा ऐकू येत आहे. मुख्यत्वेकरून आयुष्मानने त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीच्या 10 वर्षानंतर अॅक्शन भूमिका करत अॅक्शन चित्रपटात पदार्पण केले आहे. समाजातील सर्वांत व्यापक वर्गाला आकर्षित करणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे चित्रपट निवडण्यासाठी आयुष्मानला ओळखले जाते. या अॅक्शन हिरो चित्रपटात तो यापेक्षा वेगळं करताना दिसत नाही.