मुंबई- आगामी हटके थ्रिलर चित्रपट 'अॅन अॅक्शन हिरो'च्या निर्मात्यांनी गुरुवारी 'जेहदा नशा' या पहिल्या गाण्याचे लॉन्चिंग केले. इन्स्टाग्रामवर आयुष्मान खुरानाने गाण्याची एक झलक शेअर केली ज्यात त्याने कॅप्शन दिले, "#जेहदा नशा, आता पुन्हा एकदा तुझ्यावर जादू करणार आहे."
अमर जलाल, आयपी सिंग, योहानी आणि हरजोत कौर यांनी गायलेले आणि अमर जलाल आणि बल्ला जलाल यांनी लिहिलेले, हे गाणे एक डान्सिंग ट्रॅक आहे ज्यामध्ये आयुष्मान खुराना आणि नोरा फतेही झळकले आहेत.
व्हिडिओमध्ये, नोरा वेगवेगळ्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत आहे आणि गाणे आऊट झाल्यानंतर, चाहत्यांनी कमेंट विभागात रेड हार्ट्स आणि फायर इमोटिकॉन्सचा वर्षाव केला आहे. आयुष्मान खुराना आणि नोरा फतेही यांच्या वाफाळत्या हॉट केमिस्ट्रीचे कौतुक केले जात आहे.
हे गाणे अमर जलालच्या त्याच शीर्षक असलेल्या जुन्या गाण्याचा अधिकृत रिमेक आहे. नोरा फतेही व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील 'अॅन अॅक्शन हिरो'मध्ये एक खास आयटम नंबर करणार आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी या विचित्र थ्रिलर चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरचे लॉन्चिंग केले. ट्रेलरने प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळवला आहे.
अनिरुद्ध अय्यर दिग्दर्शित, या चित्रपटात जयदीप अहलावत देखील मुख्य भूमिकेत आहेत आणि 2 डिसेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट आयुष्मान खुरानाच्या कारकिर्दीतील पहिली अॅक्शन-पॅक भूमिका आहे.
दरम्यान, आयुष्मान खुराना हा अभिनेत्री अनन्या पांडे, परेश रावल, अन्नू कपूर, मनोज जोशी आणि विजय राज यांच्यासोबत आगामी कॉमेडी चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' मध्ये देखील दिसणार आहे आणि हा चित्रपट 23 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
हेही वाचा -दीपिका पदुकोण हृतिक रोशनसोबत 'फाइटर' शूटसाठी झाली रवाना