महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Amruta in Sacred Games 2 : अमृता सुभाषने सांगितली इंटिमेट सीन्सची आठवण, मासिक पाळीच्या तारखा लक्षात घेऊन झाले होते शुटिंग - मासिक पाळीच्या तारखा लक्षात घेऊन झाले होते शुटिंग

अमृता सुभाषने काही वर्षापूर्वी अनुराग कश्यपसोबत सेक्रेड गेम्स 2 साठी तिचा पहिला इंटिमेट सीन शूट केला होता. या शूटिंगदरम्यान संपूर्ण वेळ दिग्दर्शक अनुराग कश्यप किती संवेदनशील होता याबद्दल अमृताने सांगितले.

Amruta Subhash
अमृता सुभाष

By

Published : Jul 6, 2023, 5:40 PM IST

मुंबई- अमृता सुभाषने अलिकडेच लस्ट स्टोरीज २ आणि कोंकणा शर्माच्या द मिरर मध्ये भूमिका साकारल्या आहेत. यात तिने बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले. अशी दृष्ये जेव्हा कॅमेऱ्यात शूट होत असतात तेव्हा अशा दृश्यांकडे पुरुष आणि महिला चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टिकोनात फरक आहे की नाही याबद्दल भाष्य केले. अमृताने चित्रपट निर्माते अनुराग कश्यपसोबत तिच्या पहिल्या सेक्स सीनवर काम केल्याची आठवण सांगितली आणि या संपूर्ण शुटिंग प्रक्रियेदरम्यान तो किती काळजी घेत होता याविषयी सांगितले.

अमृताने सांगितले की सेक्रेड गेम्स 2 च्या शुटिंगदरम्यान, त्याने आपल्या दिग्दर्शकीय टीमला बोलावले आणि तिच्या मासिक पाळीच्या तारखेबद्दल विचारणा करुन जेव्हा तिला आरामदायक वाटेल तेव्हाच तिच्या इंटिमेट सीन्ससाठी वेळ ठरवण्याचा सल्ला दिला. 'सेक्रेड गेम्स 2 मध्ये मी अनुरागसोबत माझा पहिला सेक्स सीन केला होता', असे तिने कबूल केले.

स्त्री किंवा पुरुष असणं वादाच्या पलीकडचं होतं. तो खूप समजूतदार होता. त्याने मॅनेजमेंट ग्रुपला डायल केलं आणि त्यांना माझ्या मासिक पाळीच्या तारखांच्या आसपास सेक्स सीन्स शेड्यूल करू नका असं सांगितलं कारण त्याने मला हा प्रश्न आधी विचारला होता. त्याने प्रश्न केला होता की, 'मासिक पाळीच्या दरम्यान ती असे सीन्स देऊ शकणार आहे का?' अनुरागचे हे काळजी घेणे व विचारपूस करणे अमृताला प्रभावित करणारे ठरले.

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये, अमृता सुभाषने रॉ एजंटची भूमिका साकारली होती. यात तिने कुसुम देवी यादव ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील अमृताची भूमिका इतकी दमदार आहे की नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेल्या गणेश गायतोंडेलाही तिची आज्ञा पाळणे भाग पडले होते.

कोंकणा दिग्दर्शित द मिररमध्ये अमृता आणि तिलोतमा शोम मुख्य भूमिकेत होते. अमृताने मात्र कथन करताना तिची भूमिका समजू शकली नाही असा दावा केला. 'कधीकधी तुमची पात्रे पूर्णपणे समजून न घेणे चांगले असते,' अशी तिने प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा -

१. Shanaya Kapoor : शनाया कपूर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून करणार फिल्मी करिअरची सुरुवात

२. 'it's Rocky Day : रणवीर सिंगच्या वाढदिवशी दिग्दर्शकने शेअर केले 'रॉकी रानी की प्रेम कहानी'तील सर्वोत्कृष्ट फोटो

३. SrKs Jawan Trailer : शाहरुखच्या जवान ट्रेलरवर रोखल्या सर्व नजरा, तुम्हीही आहात का सज्ज?

ABOUT THE AUTHOR

...view details