मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्तेत असतात. अमृता फडणवीस यांचे नवीन पंजाबी 'आज मूड बना लिया' गाणे रिलीज झाले आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणे चांगलेच धुमाकूळ घालत आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्याला नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळत असतो. त्यात त्यांच्या पहिल्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली आहे. अमृता फडणवीस यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. नव्या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत ‘आज मूज बना लिया’ गाण्यावर रिल तयार केले आहे.
युजर्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव : 'अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!' हे अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे बोल आहेत. रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत तयार केलेला व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तसेच हे गाणे पाहण्यासाठीदेखील सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्या नव्या व्हिडीओवर अनेक युजर्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. युजर्सने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले गुड जाॅब मामीजी तर दुसऱ्या युजरने लिहिले जय श्रीराम तर एकाने हार्ट इमोजी टाकले. अमृता फडणवीस त्यांच्या अनोख्या फॅशन सेन्स आणि मधुर आवाजमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. तसेच त्या राजकीय टोलेबाजीमुळेदेखील प्रसिद्ध आहेत. अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.