नवी दिल्ली : मीट ब्रदर्स (Meet Brothers) आणि अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या कलाकारांनी तयार केलेला, ‘आज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ (Mood Banaleya song released) हे गाणे 6 जानेवारी रोजी रिलीज झाला. ऐश्वर्या त्रिपाठीने या गाण्याचे संगीत तयार केले आहे. अमृता फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, आज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ हे गाणे वर्षातील सर्वात मोठे बॅचलोरेट गाणे आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या या गाण्यावर अमृता फडणवीस थिरकताना दिसल्या. अमृता फडणवीस यांच्या अधिकृत ट्विटर हँडलने शेअर केलेल्या क्लिपमध्ये, ती हुक स्टेप करताना दिसत आहे. अमृता फडणवीस काळ्या कपड्यात सुंदर दिसतात.
तिचे नृत्य कौशल्य पाहून अनेक युजर्स प्रभावित झाले : अमृता फडणवीसने कॅप्शन लिहिले आहे, ‘आज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ या गाण्याच्या हुक स्टेप चॅलेंज घ्या आणि गाण्याचे हॅशटॅग वापरून तुमची स्वतःची रील तयार करा आणि त्यात आम्हाला टॅग करा. तिचे नृत्य कौशल्य पाहून अनेक युजर्स प्रभावित झाले आहेत. या गाण्यात त्यांनी हटके फॅशन ज्वेलरी परिधान केली आहे. त्यांच्या हा स्टायलिश लूक पाहून आता चाहते अधिकच उत्सुक झाले आहेत. तर, त्यांचा लूक पाहून नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.