महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 12, 2023, 4:13 PM IST

ETV Bharat / entertainment

Amrish Puri Death Anniversary: डोक्यात सतत गुंजत राहणारे अमरीश पुरींचे पाच जबरदस्त डायलॉग्ज

जबरदस्त बॅरिटोन आणि प्रभावी व्यक्तीमत्वासह धारदार संवाद यासाठी ओळखले जाणारे अमरीश पुरी १८ वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्य पाच गाजलेल्या डायलॉग्जवर एक नजर टाकूयात.

अमरीश पुरींचे जबरदस्त डायलॉग्ज
अमरीश पुरींचे जबरदस्त डायलॉग्ज

मुंबई- अमरीश पुरी हे भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांचा चित्रपटसृष्टीत इतका सहज वावर होता की त्यांच्या उपस्थितीशिवाय कोणताही हिंदी चित्रपट पूर्ण होत नव्हता. त्याच्या तीव्र बॅरिटोन आणि प्रभावी उपस्थितीने, अमरीश पुरी नेहमीच पात्रांमध्ये जादू आणण्यात यशस्वी झाले.

1970 मध्ये 'प्रेम पुजारी' मधील छोट्या गुंडाच्या भूमिकेत पदार्पण केल्यानंतर, अमरीश पुरी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि विश्वासार्ह अभिनेत्यांपैकी एक बनले. विशेषत: 'मिस्टर इंडिया'मध्ये मोगॅम्बोच्या खलनायकी भूमिकांमुळे त्यांचा पडद्यावरचा दरारा वाढला.

'विधाता'मध्ये जगावर, 'घायल'मध्ये बलवंत राय, 'दामिनी'मध्ये बॅरिस्टर चड्डा आणि 'करण अर्जुन'मध्ये ठाकूर दुर्जन सिंग यासह 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधील बलदेव सिंग या कडक वडिलांच्या भूमिकेतील त्यांची भूमिका कोणीही विसरू शकत नाही.

दुर्दैवाने, अष्टपैलू अभिनेता अमरीश पुरी यांनी दीर्घ आजाराशी संघर्ष करत 12 जानेवारी 2005 रोजी अखेरचा श्वास घेतला. अमरीश पुरी यांचे निधन होऊन 18 वर्षे झाली आहेत आणि त्यांच्या सदाबहार पडद्यावरील प्रतिमेमुळे ते आजही सिनेफिल्सच्या स्मरणात आहेत. निःसंशयपणे, त्याचे श्रेय त्यांच्या प्रतिष्ठित संवादांना जाते जे अजूनही आपल्या डोक्यात गुंजतात. अमरीश पुरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांचे आयकॉनिक डायलॉग्स पाहूयात.

1. मोगॅम्बो खुश हुआ

अमरीश पुरींचे जबरदस्त डायलॉग्ज

अमरीश पुरी यांचा हा आयकॉनिक डायलॉग 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या मिस्टर इंडिया चित्रपटात होता. या चित्रपटात तो एक मेगालोमॅनिक हुकूमशहा मोगॅम्बो म्हणून काम करत होता जो बॉलीवूडच्या इतिहासातील सर्वात खतरनाक म्हणून ओळखल्या जाणार्‍या खलनायकांपैकी एक बनला होता. अनिल कपूर आणि श्रीदेवी या चित्रपटातील इतर कलाकार होते.

2. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी

शाहरुख-काजोलच्या रोमँटिक केमिस्ट्रीसाठी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपट ओळखला जातो. बहुतेक लोक नायक नायिकेच्या केमेस्ट्रीसाठी हा चित्रपट पाहात असले तरी बहुतेकांनी हा चित्रपट खलनायकासाठीही पाहिला आहे. चौधरी बलदेव सिंग, ज्यांना बौजी म्हणूनही ओळखले जाते, या भूमिकेने अमरीश पुरी यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी एका कठोर भारतीय वडिलांची भूमिका साकारली ज्याने सुरुवातीला आपल्या मुलीच्या प्रेमाला विरोध केला पण शेवटी तिला प्रियकरासोबत निघून जाण्याचा निर्णय घेतला. हा संवाद क्लायमॅक्स दरम्यान होता जेव्हा पुरी यांनी काजोलला "जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी" डायलॉग म्हटला.

3. आओ कभी हवेली पे

अमरीश पुरींचे जबरदस्त डायलॉग्ज

'नगीना' चित्रपटातील अमरीश पुरीचा हा डायलॉग नक्कीच बॉलिवूड चाहत्यांच्या मनात मुरलेला आहे. वर्षानुवर्षे, 'आओ कभी हवेली पे', हे मीम निर्मात्यांसाठी आवडते वन-लाइनर बनले आहे.

4. इतने तुकडे करूंगा की तू पेहचाना नहीं जायेगा

अमरीश पुरींचे जबरदस्त डायलॉग्ज

अमरीश पुरी यांनी 2001 मध्ये आलेल्या 'गदर-एक प्रेम कथा' या चित्रपटात अशरफ अलीची भूमिका साकारली होती. या खलनायकी भूमिकेला दुसरी तोड नाही. यातील त्यांचा ‘इतने तुकडे करूंगा की तू पेहचाना नहीं जायेगा’ या चित्रपटातील संवाद खूप गाजला होता.

5. कोई भी झूठ इतना महान नही होता की जिसके सामने सर झुकाया जाय

1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झूठ बोले कौवा काटे' या चित्रपटात अमराीश पुरी यांनी हा जोरदार डायलॉग दिला. या चित्रपटात अनिल कपूर आणि जुही चावला मुख्य भूमिकेत होते.

हेही वाचा -Anushka Sharma Petition : अनुष्का शर्माचे कारवाईला आव्हान, कोर्टाची आयकर विभागालाच नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details