महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

४५ वर्षाने बच्चनने सांगितले 'दीवार'चे रहस्य, म्हणाले, "ही टेलरची चुक होती"

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अ‍ॅंग्री यंग मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ७० व ८० च्या दशकातील चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप पाडली. फिल्म 'सिलसिला' असो वा 'नमक हलाल' असो, अमिताभ यांच्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांना सुपरस्टार बनवलं. त्याच वेळी, त्याचा आणखी एक फिल्म 'दीवार' आहे जो 1975 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभचा गाठ शर्ट एक नवीन ट्रेंड म्हणून उदयास आला होता. या चित्रपटाच्या 45 वर्षानंतर अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाशी संबंधित एक रहस्य उघडले आहे.

Amitabh Bachchan the secret of Deewar
अमिताभचा 'दीवार' चित्रपटातील लूक

By

Published : Jun 24, 2021, 8:22 PM IST

Updated : Jan 18, 2023, 12:35 PM IST

मुंबई- अभिनेता अमिताभ बच्चन यांनी १९७० -८० हा काळ खूप गाजवला. या काळातच त्यांची प्रतीमा अँग्री यंग मॅन अशी झाली. देशभर त्यांचा चाहता वर्ग वाढला. बच्चनच्या सिनेमाची देशभर प्रतीक्षा सुरू झाली. त्याच्या हेअर स्टाईलची, चालण्या बोलण्याची नक्कल होऊ लागली. अनेक कलाकारांनी त्यांचे डायलॉग आणि आवाज याच्या जोरावर कमाई सुरू केली. याच काळात 'दीवार' हा चित्रपट आला आणि सुपरहिट झाला. याच चित्रपटाच्या दरम्यानचा एक किस्सा खुद्द अमिताभ यांनी सांगितला आहे.

आपल्याला 'दीवार' हा चित्रपट आठवत असेल. या चित्रपटात तो ब्लू डेनिम शर्ट, खाकी पॅन्ट आणि खांद्यावर दोरी घेऊन पडद्यावर अवतरतो. त्याचा हा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला. कारण यात त्याने आपल्या शर्टला गाठ मारलेली होती. पण प्रत्यक्षात घडलेली गोष्ट वेगळीच होती. हा शर्ट टेलरने चुकीचा शिवला होता. टेलरच्या चुकीने शर्टची उंची जास्त झाली होती. परंतु शर्ट बदलण्या इतका वेळ नव्हता. शुटिंग थांबले असते. त्यामुळे बच्चनने या शर्टला गाठ मारली आणि टेकसाठी सज्ज झाला. दिग्दर्शकांना त्यांचा हा अवतार आवडला आणि शुटिंग सुरू झाले. बिग बीने अलीकडेच आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्याने सांगितले आहे, की टेलरच्या चुकीमुळे हा लूक प्रत्यक्षात ठेवण्यात आला होता.

अमिताभ लिहितात- ''ते असेही दिवस होते जेव्हा गाठ बंधालेले शर्ट घालावे लागले होते. त्याचाही एक किस्सा आहे. खरंतर तो शुटिंगचा पहिला दिवस होता. कॅमेरा, रोल...सर्व काही तयार होते. तेव्हा कळते की शर्ट गुढघ्यापर्यंत लांब आहे. दिग्दर्शक दुसरा शर्ट येईपर्यंत वाट पाहण्यास तयार नव्हता. अखेर शर्टला गाठ बांधावी लागली.''

अमिताभचा हा लूक प्रेक्षकांना खूप भावला. त्या काळात शर्टला गाठ मारण्याची फॅशनही आली होती. तर असा हा 'दीवार' खूप गाजला. शशी कपूर, परवीन बॉबी, नीतू सिंग हेही अमिताभ बच्चन यांच्या ‘दीवार’ या चित्रपटात दिसले होते. अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहेत. तसेच ते 'चेहरे' आणि 'झुंड' मध्ये देखील प्रमुख भूमिकेत आहेत.

Last Updated : Jan 18, 2023, 12:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details