महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Amitabh Bachchan turns 81: अमिताभचं कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत जोरदार वाढदिवस सेलेब्रिशन - अमिताभ बच्चन वाढदिवस

सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 81 वा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा झाला. मुंबईतील त्यांच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा करत असतानाचे फोटो त्यांची नात नव्या नवेलीनं शेअर केले आहेत.

Amitabh Bachchan turns 81
बिग बी जोरदार वाढदिवस सेलेब्रिशन

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 3:58 PM IST

मुंबई- बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी त्यांचा 81 वा वाढदिवस आपल्या समस्त कुटुंबीयांसोबत साजरा केला. यावेळी जया बच्चन, श्वेता बच्चन, नव्या नवेली नंदा, अगस्त्य नंदा, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चनदेखील या वाढदिवस सोहळ्यात व्हिडिओ चॅटद्वारे सामील झाला होता. मुंबईतील घराबाहेर प्रतीक्षा करत असलेल्या चाहत्यांना अभिवादन करुन त्यांनी हा खास क्षण साजरा केला.

घराबाहेरची दृष्ये पापाराझींनी व्हिडिओच्या माध्यामातून तमाम चाहत्यापर्यंत पोहोचवली तर, बिग बींची नात नव्या नवेली नंदा हिने बच्चन यांच्या घरात मध्यरात्री रंगलेल्या वाढदिवसाचे फोटो पोस्ट केले. नव्याने आजी आजोबांसोबत आणि आराध्या, अगस्त्य नंदा या भावंडासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिनं आजोबा अमिताभसोबतचा एक फोटोही नव्यानं शेअर केला आहे.

श्वेता बच्चनने देखील वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. श्वेताने अमिताभसोबतचा एक कोलाज शेअर केला असून यात तिनं वडीलांना मिठी मारल्याचं दिसतंय. तिनं कॅपशनमध्ये अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही लिहिल्या आहेत. या प्रसंगी श्वेताने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता तर बिग बींनी ग्राफिक ब्लेझर आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली होती.

दरम्यान, अमिताभ अलीकडेच 'उंचाई' या कौटुंबिक कॉमेडी चित्रपटामध्ये अनुपम खेर, परिणिती चोप्रा आणि बोमन इराणी यांच्यासोबत स्क्रिन स्पेस शेअर केली होती. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाला बिग बीचे चाहते आणि तमाम प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अमिताभ बच्चन आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटात दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासोबत दिसणार आहेत. यासोबतच बिग बी, रिभू दासगुप्ताच्या आगामी कोर्टरूम ड्रामा 'सेक्शन 84' मध्ये काम करत आहेत. त्यानंतर तब्बल 32 वर्षानंत अमिताभ आणि रजनीकांत 'थलायवर 170' मध्ये पुन्हा एकत्र काम करणार आहत.

ABOUT THE AUTHOR

...view details