महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Amitabh Bachchan Surprises Fans : रिवाज मोडत अमिताभ यांनी जलसाबाहेर जमलेल्या चाहत्यांना दिली सरप्राईज भेट - जलसा बंगल्याबाहेर जमणाऱ्या चाहत्यांना अभिवादन

रविवारी अमिताभ बच्चन यांनी जलसा बंगल्याबाहेर जमणाऱ्या चाहत्यांना अभिवादन करण्याचा सिलसिला जारी ठेवला. अगोदर हजर राहणार नाही असे कळवून देखील त्यांनी चाहत्यांच्या प्रेमाखातर आला रिवाज मोडला.

Amitabh Bachchan surprises fans
अमिताभ यांनी जलसाबाहेर जमलेल्या चाहत्यांना दिली सरप्राईज भेट

By

Published : May 8, 2023, 6:49 PM IST

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन हे दर रविवारी सकाळी मुंबईतील आपल्या जलसा या बंगल्या बाहेर जमलेल्या चाहत्यांना भेटतात. साधारण १९८२ पासून सुरू झालेला हा सिलसिला अजूनही जारी आहे. रविवारी सकाळी हजारो चाहते त्यांच्या बंगल्याबाहेर बिग बी यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. बच्चनही त्यांना निराश न करता बाहेर येऊन अभिवादन करतात.

अमिताभ यांनी मोडला रिवाज - गेल्या रविवारी अमिताभ बच्चन कामाच्या निमित्ताने बाहेर जाणार होते. त्यामुळे त्यांनी चाहत्यांना प्रतीक्षा न करण्याचा सल्ला दिला होता. जेव्हा अशी सूचना ते देतात तेव्हाही काही लोक त्याची वाट पाहात काही काळ थांबतात. रविवारी काहीसा असाच प्रकार घडला. बिग बी यांनी आपल्या चाहत्यांना 'मीट अँड ग्रीट' हा त्यांचा दिनक्रम पाळता येणार नाही असा सल्ला देऊनही अखेरीस त्यांच्या रविवारच्या भेटीसाठी उपस्थित राहून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. त्यांच्या ब्लॉगवर जात बिग बींनी या प्रसंगातील अनेक फोटोही शेअर केले आहेतआपला रिवाज मोडत अमिताभ यांनी चाहत्यांना अभिवादन केल्याने जलसा बाहेर चाहत्यांच्या जल्लोष पाहायला मिळाला.

अमिताभ यांनी जलसाबाहेर जमलेल्या चाहत्यांना दिली सरप्राईज भेट

जलसा बाहेर जमणारे चाहते - बच्चन यांच्या बंगल्याच्या बाहेर जमणारे चाहते हे मुंबई बाहेरुन, देशाच्या वेगवेगळ्या कॉर्नवरुन आलेले असतात. बच्चन यांची एक छवी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी, त्यांचे दर्शन करण्यासाठी ते आलेले असतात. हातामध्ये अमिताभ यांचे आकर्ष फोटो, बॅनर्स, फ्लेक्स, वेगवेगळ्या आकाराचे स्लोगन्स लिहिलेल्या पाट्या हातात धरुन हे चाहते जमा होतात. इथं हजर असणाऱ्यांमध्ये सर्व वयोगटातील लोक असतात हे विशेष. बंद असलेल्या बंगल्याच्या बाहेरचे फाटक उघडण्यापूर्वी सुरक्षा रक्षकांची हालचाव वेगवान होता. मग थोड्याच वेळात दरवाजे किलकिले होत उघडले जातात आणि बंगल्याच्या दरवाजातून हसमुख अमिताभ यांचे आगमन होते. इकडे लोकांचा जयघोष वाढीला लागतो. हळहळू चालत अमिताभ गेटच्या जवळ तात्पुरते बनवलेल्या प्लॅटफॉर्मवर चढतात आणि हात उंचावून सर्वांना दर्शन देतात.

जलसा बंगल्या बाहेर जमलेली चाहत्यांची गर्दी

दरम्यान, वर्क फ्रंटवर, अमिताभ दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासोबत प्रोजेक्ट के मध्ये दिसणार आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित, प्रोजेक्ट के हा द्विभाषिक चित्रपट आहे जो एकाच वेळी हिंदी आणि तेलगू या दोन भाषांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शूट केला गेला आहे. बिग बी रिभू दासगुप्ताच्या पुढील कोर्टरूम ड्रामा चित्रपट सेक्शन 84 मध्ये देखील दिसणार आहेत.

हेही वाचा -Arijit Singh Injured : लाईव्ह कार्यक्रमात चाहत्याने हात ओढल्याने अरिजित सिंह जखमी; चाहत्याला स्टेजवरच झापले, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details