मुंबई- मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या फॅन फॉलोइंगची कमतरता नाही. वयाच्या ७९ व्या वर्षीही बिग आजही चाहत्यांच्या हृदयात स्थान टिकवून आहेत. बिग बींची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी क्षणोक्षणी सोशल मीडियावर सक्रिय असतात. बिग बी रोज काही ना काही पोस्ट करत असतात. आता बिग बींनी असाच एक फोटो शेअर केला आहे, जो त्यांच्या एका महिला चाहतीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा फोटो इतर फोटोंपेक्षा वेगळे आहे. चुंबनाने भरलेले हा फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करून बिग बींनी काय लिहिले आहे, हे वाचून चाहत्यांनाही ह,सू आवरले नाही. बिग बींनी हा फोटो शेअर करत लिहिले, 'अरे, पण देवी.. हसाण्यासाठी थोडीतरी जागा सोड!' या फोटोमध्ये बिग बींच्या संपूर्ण चेहऱ्यावर लिपस्टिकचा निशाणा आहे.