मुंबई :ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी वट पौर्णिमा देखील आहे. आज हे जोडपे त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहेत. तसेच या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिने इंन्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिच्या आई आणि वडीलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तिने इंस्टाग्रामवर जुने मोनोक्रोम फोटो शेअर करत लिहले, ' 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा., आता तुम्ही 'गोल्डन' आहात तुमच्या दीर्घ लग्नाचे रहस्य काय आहे असे विचारले असता, माझ्या आईने उत्तर दिले प्रेम, आणि बाबा म्हणाले होते ‘पत्नी ही नेहमीच योग्य असते’ असे तिने तिच्या पोस्टवर लिहले आहे. फोटोमध्ये जया बच्चन साडी नेसलेली दिसत आहे. याशिवाय ती फोटोमध्ये पतीकडे बघत हसत आहे. तर फोटोमध्ये अमिताभने पॅटर्न शर्ट आणि ट्राउझर्स घातलेले दिसत आहे.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण : श्वेता बच्चनच्या या पोस्टवर अनेक वापरकर्त्यांनी कमेंट केली आहे. या जोडप्याला त्यांच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त अभिनंदन करून एका चाहत्याने लिहिले, 'त्यांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा, माशाल्लाह त्यांचे आणखी 50 वर्षे एकत्र पुढे जावेत. तर दुसर्याने लिहिले, 'तुमच्या आई आणि वडिलांना 50व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा! तसेच आणखी एका चाहत्याने कमेंट केली की, 'ते एक हॉट जोडपे आहे! धन्य!!!!' तसेच या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. झोया अख्तर, चंकी पांडे आणि अपूर्व मेहता यांच्यासह इतरांनी देखील त्यांना त्यांच्या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.