मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी नऊ दिवस एकाकी घालवल्यानंतर त्यांची कोविड १९ टेस्ट निगेटिव्ह आली होती. आता ते पुन्हा एकदा लोकप्रिय क्विझ आधारित रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर परतले आहेत.
अमिताभ यांनी ही माहिती चाहत्यांना आपल्या ब्लॉगमधून कळवली आहे. कामाच्या पहिल्या दिवशी विश्रांती घ्यायची होती त्यामुळे हे कळवण्यास उशीर झाल्याचे अमिताभ यांनी म्हटलंय.
"उशीर झाला कारण (मला) कामाच्या पहिल्या दिवशी विश्रांती घ्यायची होती.. पण मी केबीसीच्या सेटवर परत आलो आहे..." असे त्यांनी लिहिलंय.
'कौन बनेगा करोडपती' हे 'हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर?' चे अधिकृत हिंदी रूपांतर आहे. सुपरस्टार शाहरुख खानने सादर केलेला तिसरा सीझन वगळता 2000 मध्ये या शोचे सुरुवात झाल्यापासून सर्व सिझनचे सत्रसंचालन अमिताभ बच्चन यांनीच केले आहे.
अभिनयाच्या आघाडीवर अमिताभ बच्चन आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. प्रभास आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'उंचाई', 'गुड बाय' आणि 'प्रोजेक्ट के' मध्येही अमिताभ दिसणार आहेत.
हेही वाचा -अनन्या पांडेने शेअर केले मथुरा भेटीचे सुंदर फोटो