मुंबई - Amitabh bachchan and shweta bachchan: अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. अमिताभ बच्चन हे फक्त एक उत्तम अभिनेताच नाहीत तर ते एक चांगले वडील देखील आहेत. 'बिग बी' मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांच्यावर खूप प्रेम करतात. अमिताभ यांनी आता त्यांची लाडकी मुलगी श्वेता बच्चन नंदाला एक अनमोल भेट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी जया बच्चन यांच्या संमतीनंतर अमिताभ बच्चन यांनी 8 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदाला विठ्ठल नगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेडमध्ये बांधलेला 'प्रतीक्षा बंगला भेट दिला आहे. हा बंगला जुहूमध्ये आहे.
अमिताभ बच्चन यांनी दिली मुलीला भेट : प्रतीक्षा बंगला हा 9 हजार 585 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे या बंगल्याचे संयुक्त मालक आहेत. 7 हजार 255 चौरस फूट जमिनीचा मालकी हक्क एकट्या अमिताभ यांच्याकडे आहेत. अमिताभ-जया यांनी श्वेता बच्चनला दिलेल्या घराच्या डीडवर स्वाक्षरी केली आहे. याशिवाय घर नावावर करून देण्यासाठी त्यांना 50.65 लाख रुपये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क देखील भरला आहे. बंगल्याच्या बाजारभावाबाबत बोलायचं झालं तर याची किंमत जवळपास 50.63 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतय. याबाबत बच्चन कुटुंबानं अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर केलेलं नाही.