महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Big B greets fans bare feet : प्रेक्षकांना अभिवादन करताना पायात चप्पल का घालत नाही, याचा बिग बींनी केला खुलासा - प्रेक्षकांना अभिवादन करताना

अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या रविवारच्या प्रेक्षक अभिवादनाचा फोटो शेअर केला. यासाठी ते अनवाणी चालत आले होते. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी जे लिहिले, त्यामुळे चाहते भारावले आहेत.

Big B greets fans bare feet
बिग बींनी केला खुलासा

By

Published : Jun 7, 2023, 1:36 PM IST

मुंबई - ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन कधीही त्यांचा उत्साह मावळू देत नाहीत. सतत मिश्कील कॅप्शन्स देत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. काही दशकांपासून त्यांच्या घराबाहेर रविवारी चाहते जमतात. त्यांना ते आपुलकीने भेटतात व अभिवादन करतात. कालच्या रविवारीही ते चाहत्यांना भेटले व फोटोसह त्यांनी कॅप्शनममध्ये लिहिले त्यामुळे चाहते भारावून गेले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी रविवारी त्यांच्या घराच्या बाहेर असलेल्या गर्दीचा फोटो शेअर केला. त्यांना भेटण्यासाठी घराबाहेर येताना त्यांनी पायात पांढरे मोजे घातले होते, मात्र चप्पल किंवा बूट न घालता ते अनवाणी चालत चाहत्यांच्या दिशेने जाताना दिसतात. त्यांच्या हा फोटो पाहून अनेकांनी ते अनवाणी का चालत आहेत असा सवाल बच्चन यांना केला होता. यावर अमिताभ यांनी लिहिले, 'ते मला नेहमी म्हणतात, चाहत्यांना भेटण्यासाठी कोणी अनवाणी पायाचे चालत जातं का? मी त्यांना म्हणालो, मी जातो..तुम्ही मंदिरात अनवाणी पायाने चालत जाता.. रविवारी मला शुभेच्छा देण्यासाठी येणारे माझे मंदिरच आहे'. बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोत त्यांनी पांढरा कुर्ता परिधान केला असून त्यावर निळ्या आणि लाल जाकीट घातले आहे. फोटोत अमिताभ गर्दीला अभिवादन करताना दिसतात.

अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांबाबत काढलेल्या या उद्गारामुळे त्यांच्या प्रती चाहत्यांबद्दल असलेला अभिमान वाढला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना अमिताभ बच्चन कसे महान आहेत याबद्दल लिहिलंय. अमिताभ बहच्चनवर अलोट प्रेम करणारा फार मोठा चाहता वर्ग आहे. गेली अनेक दशके बिग बी यांच्या घराच्या बाहेर चाहत्यांची रविवारी सकाळी गर्दी उसळते. अमिताभ घरी आहेत व ते आपल्याला भेटण्यासाठी बाहेर येतील म्हणून चाहते अक्षरशः डोळ्यात प्राण आणून वाट पाहात असतात.

दरम्यान, चित्रपटाच्या पातळीवर अमिताभ दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासोबत प्रोजेक्ट के मध्ये दिसणार आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित, प्रोजेक्ट के हा द्विभाषिक चित्रपट आहे. हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये एकाच वेळी विविध ठिकाणी शूट केला गेला आहे. बिग बी रिभू दासगुप्ताच्या आगामी कोर्टरूम ड्रामा चित्रपट सेक्शन 84 मध्ये देखील दिसणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details