मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा येत्या ११ ऑक्टोबर रोजी ८० वाढदिवस साजरा होणार आहे. त्यांचे लाखो फॅन्स यादिवशी त्यांना अभिवादन करता, त्यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करतात. बिग बी यांचे फिल्म इंडस्ट्रीतील लोकही हा दिवस अत्यंय अभिमानाने साजरा करतात. यावेळी फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने अमिताभ यांच्या ८० वा जन्मदिन अनोख्या पध्दतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. येत्या ८ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत अमिताभ यांच्या चित्रपटांचा महोत्सव भरवला जाणार आहे. त्यांचे जुने क्लासिक चित्रपट पाहण्याची संधी यावेळी चाहत्यांना मिळणार आहे.
अमिताभ यांच्या जन्मदिनानिमित्य आयोजित केल्या जाणाऱ्या चित्रपटाचे शीर्षक - 'बच्चन बॅक टू द बिगिनिंग' असे असेल. देशभरातील १७ महत्त्वाच्या शहरात या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.