महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आमिरच्या जावयाची लग्नासाठी हटके एंट्री, आला जिम ट्रेनरच्या वेशात! व्हिडिओ व्हायरल - आमिरच्या मुली

Ira Khan Wedding : आमिर खानची मुलगी आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांचं आज लग्न झालं. यावेळी नुपूर रिसेप्शनस्थळी अत्यंत विचित्र पेहरावात पोहोचला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Nupur Shikhare
Nupur Shikhare

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 10:42 PM IST

Updated : Jan 3, 2024, 10:54 PM IST

मुंबई Ira Khan Wedding: आजचा दिवस बॉलीवूड इंडस्ट्रीसाठी खास आहे. 3 जानेवारीला आमिर खानची मुलगी आयरा खाननं तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न केलं. या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे.

रिसेप्शनला जिमवेअरमध्ये पोहचला : लग्नाची नोंदणी केल्यानंतर नुपूर शिखरे चक्क जिमवेअरमध्ये रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचला. तो मित्रांसोबत 8 किलोमीटर रनिंग करत कार्यक्रमस्थळी पोहचला. तेथे त्यानं ढोल वाजवला आणि भरपूर डान्सही केला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाच्या दिवशी आयरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय दिसली. ती 'ब्राइड टू बी' हेअरबँड घालून पोस्ट शेअर करत होती.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया : दोघांची लग्नाची विचित्र शैली सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. यांच्या व्हायरल व्हिडिओवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं - हा कोणता वर आहे जो आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी जिमचे कपडे घालून येत आहे. आणखी एका चाहत्यानं लिहिलं - यांनी सर्व स्टिरियोटाइप मोडले. मिस्टर परफेक्शनिस्टची (आमिर खान) मुलगी आहे म्हणजे ती काहीतरी वेगळं आणि अनोखं करेल हे आम्हाला माहीत होतं, असं आणखी एका चाहत्यानं लिहिलं.

तीन वर्षांपासून एकत्र आहेत : आयरा आणि नुपूर गेल्या तीन वर्षांपासून एकत्र आहेत. या दोघांनी लॉकडाऊन दरम्यान लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी नूपुरनं आयराला लग्नासाठी प्रपोज केलं होते. दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर मित्र आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली. आता 13 जानेवारीला दोघेही महाराष्ट्रीयन पद्धतीनं उदयपूरच्या ताई अरावलीत सात फेरे घेणार आहेत.

हे वाचलंत का :

  1. कोर्ट मॅरेजनंतर आयरा खान आणि नुपूर शिखरे होणार राजस्थानला रवाना
Last Updated : Jan 3, 2024, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details