मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. पुरी जगन्नाधचा आगामी चित्रपट 'डबल आईस्मार्ट' सेटवर हा अपघात झाला आहे. संजय दत्त आता बरा असून काळजी करण्यासारखे काही नसल्याचे सांगण्यात येत आहे. बँकॉकमध्ये एका हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान ही घटना झाली आहे. दरम्यान संजय दत्त हा सेटवर जखमी झाल्याच्या बातम्या समोर येत असताना, पुरी जगन्नाधने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये संजय हा नेहमाप्रमाणेच सुंदर दिसत आहे. संजयच्या डोक्याला दुखापत झाली माहिती समोर येत आहे. संजय दत्तचे अनेक बॅक टू बॅक चित्रपट सध्या येत आहेत आणि हे चित्रपट चाहत्यांना देखील आवडत आहेत.
संजय दत्तचे लूक : 'डबल आईस्मार्ट' या चित्रपटामधील संजय दत्तचे लूक याआधी प्रदर्शित करण्यात आले होते. या लूकमध्ये तो एका वेगळ्याच अंदाजात दिसत होता, त्यामुळे संजयच्या या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेने पाहत आहे. पॅन इंडिया निर्मित या चित्रपटात संजय हा 'बिग बुल'ची भूमिका साकारणार आहे. दरम्यान संजय दत्त फर्स्ट लूक पोस्टरमध्ये स्टायलिश अंदाजात दिसला होता. संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले होते. फर्स्ट लुक पोस्टरमध्ये संजय हा काळ्या रंगाच्या सूट, अंगठ्या आणि उत्कृष्ट घड्याळ टॅटूसह दिसला होता. या पोस्टरमध्ये सिगार ओढताना दिसला आहे.