नवी दिल्ली - Richa Chadha experience of flight delay: अलिकडे विमानांच्या उड्डाणाला विलंब होण्याची अनेक तक्रारी वाचायला मिळतात. इंडिगो एअरलाईन्सच्या विमान विलंबाचा फटका अभिनेत्री रिचा चड्ढाला बसल्याचे तिने बुधवारी सांगितले. तिलाही इंडिगो एअरलाइन्सच्या दोन देशांतर्गत उड्डाणांमध्ये विलंब सहन करावा लागला.
रिचाने सोशल मीडिया हँडल X वर सांगितले की तिने गेल्या तीन दिवसात तीन विमान प्रवास केले. यात ती दोन वेळा इंडिगोतून प्रवास करत होती तर एक वेळा आंतरराष्ट्रीय फ्लाइटमधून. यामध्ये तिचा देशांतर्गत प्रवास करण्याचा अनुभव सांगताना ती म्हणाली की इंडिगोतून प्रवास करताना दोन्हीवेळा तिला विलंबाचा अनुभव घ्यावा लागला. उशीरा उड्डाणांच्या समस्येवर विचार करताना, तिने सुचवले की दिल्लीतील धुके आणि मुंबईतील नुकत्याच झालेल्या एअर शो या कारणांमुळे इंडिगोच्या उड्डाणांना फटका बसला असावा.
“माझ्या तीन दिवसातील तीन प्रवासात पहिल्या दिवशी इंडिगो 6E ला 4 तासांपेक्षा जास्त उशीर झाला. दुसरा दिवशी इंडिगो 6Eला 4 तास उशीर झाला. परंतु काही मार्गांवर फक्त थेट उड्डाणे बहुतेकदा इंडिगोचीच असतात. तिसऱ्या दिवशी, आंतरराष्ट्रीय उड्डाण केले त्यात काहीही अडचण नव्हती.", असे तिने एक्सवर म्हटलंय.
“14 जानेवारीला मुंबईत एअर शो होता, त्यामुळे सकाळी धावपट्टी बंद होती. नंतर उत्तर भारतात धुक्यामुळे दिल्ली धावपट्टी बंद होती. देशभरात उड्डाणांना उशीर झाला, कर्मचाऱ्यांचा तणावही वाढला. मला आश्चर्य वाटते की केवळ एका व्यक्तीवर शारिरीक हल्ला झाला कारण राग खूप वाढला होता (मी हिंसा सहन करत नाही), ” असे ती X वर पुढे म्हणाली.
"यातून शिकण्याचा धडा म्हणजे मक्तेदारी, यामुळे एअरलाइन्स, विमानतळाची मालकी किंवा नेतृत्व यांच्या जबाबदारीचा अभाव निर्माण होतो. सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जोपर्यंत आम्ही हे ओळखत नाही, तोपर्यंत आमच्याकडून पैसे उकळताना आमची गैरसोय होईल आणि जर आपण जागे झालो नाही तर आपण त्यास पात्र आहोत,” असंही ती पुढे म्हणाली.
वैमानिकाला झाली होती मारहान - अलीकडेच दिल्ली विमानतळावर विमान उशीर झाल्याची घोषणा करणाऱ्या इंडिगोच्या पायलटवर एका प्रवाशाने हल्ला केला होता. या घटनेनंतर प्रवाशाला अटक करण्यात आली. रविवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक प्रवासी गोव्याला जाणार्या फ्लाइटच्या आत घोषणा करत असलेल्या पायलटवर हल्ला करताना दिसला. 10 तासांपेक्षा जास्त विलंबानंतर विमानाने संध्याकाळी 6 वाजता दिल्लीहून उड्डाण घेतल्याचे सांगण्यात आले. यानंतर इंडिगोने वैमानिकावर हल्ला करणाऱ्या प्रवाशाला 'नो-फ्लाय लिस्ट'मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा -
- 'खो गए हम कहाँ' सक्सेस पार्टीत चमकले अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव
- पंकज त्रिपाठी स्टारर 'मैं अटल हूं'च्या दुसऱ्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
- रामायण फेम कलाकार अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलियाचे अयोध्येत आगमन