महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Salman pays tribute to Kaushik : कायम स्मरणात राहाल, म्हणत सलमानने कौशिक यांना वाहिली श्रद्धांजली

अभिनेता सतिश कौशिक यांच्या निधनाबद्दल सलमान खानने शोक व्यक्त केला आहे. तुम्ही माझ्या कायम स्मरणात राहाल असे म्हणत सलमानने कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.

सलमानने कौशिक यांना वाहिली श्रद्धांजली
सलमानने कौशिक यांना वाहिली श्रद्धांजली

By

Published : Mar 9, 2023, 4:38 PM IST

मुंबई- अभिनेता सलमान खानने गुरुवारी त्याच्या सोशल मीडियावर अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल मनापासून शोक व्यक्त केला. सलमानने ट्विटरवर लिहिले की, तुम्ही ज्याच्यावर नेहमी प्रेम केले, ज्याचा आदर केला आणि तो असा माणूस होता ज्याबद्दल त्यांना नेहमी लक्षात ठेवू. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि कुटुंब आणि प्रियजनांना शक्ती मिळो... #RIP सतीश जी."

बुधवारी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने सतिश कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. दिवंगत ज्येष्ठ अभिनेता कौशिक यांचे पार्थिव आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सतिश कौशिक यांचा मृतदेह आज दिल्लीहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला पाठवला जाईल, असे सांगण्यात आले.

सलमान आणि सतीश यांनी यापूर्वी 'चल मेरे भाई', 'दुल्हन हम ले जाएंगे' आणि 'भारत' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सलमान खानच्या गाजलेल्या 'तेरे नाम' या रोमँटिक ड्रामा चित्रपटाचे सतीश कैशिक यांनी दिग्दर्शन केले होते, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह दिल्लीच्या दीनदयाल रुग्णालयात आणण्यात आला होता.

7 मार्च रोजी सतीश कौशिक यांनी मुंबईत शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या होळीच्या पार्टीला हजेरी लावली होती. पार्टीतील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत होते. एका दिवसानंतर, ते आजारी पडले तेव्हा ते बुधवारी एका जवळच्या मित्राच्या होळी पार्टीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सतीश यांचे जवळचे मित्र असलेले अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाची बातमी गुरुवारी पहाटे सोशल मीडियावर शेअर केली. अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन, असे खेर यांनी दोघांच्या फोटोंसह ही दुःखद बातमी दिली. हिंदीतील ट्विटमध्ये खेर यांनी लिहिले, मला माहित आहे की मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे, पण मी माझ्या जिवलग मित्र सतिश कौशिकबद्दल असे लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. ४५ वर्षांच्या मैत्रीवर आज असा अचानक पूर्णविराम लागला!! सतीश तुझ्याशिवाय आयुष्य कधीच सारखे होणार नाही! ओम शांती!

सतीश कौशिक हे एक अष्टपैलू अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते होते, ज्यांनी आपल्या सुंदर आणि अचूक टायमिगंसह अभिनयाने आणि विनोदाच्या अद्वितीय भावनेने भारतीय चित्रपट उद्योगात आपला ठसा उमटवला. 1980 आणि 1990 च्या दशकात 'मिस्टर इंडिया', 'साजन चले ससुराल' आणि 'जुदाई' सारख्या लोकप्रिय चित्रपटांमधील कामामुळे त्यांना ओळख मिळाली.

हेही वाचा -Saiee Manjrekar In I Smart Shankar : आयस्मार्ट शंकरमध्ये राम पोथिनेनीसोबत झळकणार सई मांजरेकर

ABOUT THE AUTHOR

...view details