हैदराबाद - रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पा: द राइजच्या सिक्वेलच्या रिलीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, परंतु असे दिसते की त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुष्पा 2 चे चित्रीकरण सध्या थांबवण्यात आले आहे. पुष्पा चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार सध्याचे फुटेज 'डिलीट' करून पुन्हा सुरू करावे की नाही याबाबत चर्चा करत आहेत.
पुष्पा २ च्या शुटिंगवर दिग्दर्शक असंतुष्ट - असे म्हटले जाते की, चित्रपटाचा दिग्दर्शक सुकुमार, पुष्पा 2 साठी आतापर्यंत जे शुटिंग केले गेले आहे त्याबद्दल 'असंतुष्ट' आहे. नव्याने सुरुवात करण्यासाठी, चित्रपट निर्माते आता सध्याचे फुटेज डिलीट करायचे की नाही यावर विचार करत आहेत. ही घटना अशा वेळी घडतेय की जेव्हा दिग्दर्शक 8 एप्रिलला अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्य पुष्पा 2 चा टीझर लॉन्च करण्याची योजना आखत आहे.
पुष्पा २ चे शुटिंग थांबले- पुष्पा 2 चे पुढील शुटिंग आता तीन महिन्यांनंतर सुरू होईल. त्यामुळे हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होऊ शकत नाही. तथापि, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की, आत्तापर्यंत, एकतर शूटिंग थांबवल्याबद्दल किंवा पुष्पा 2 च्या रिलीजची तारीख पुढे ढकलल्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती निर्मात्यांकडून पुढे आलेली नाही.
पुष्पा २ मध्ये फहद फजिल अल्लु अर्जुनला नडणार - 2023 मधील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे पुष्पा: द रुल. रश्मिका मंदान्ना देखील या चित्रपटात दिसणार आहे आणि तिची श्रीवल्लीची भूमिका पुन्हा साकारणार आहे. पुष्पा: द राइज, सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित, 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात लाल चंदन तस्करी करणाऱ्या सिंडिकेटमधील एका राकट व्यक्तीची चढाई दाखवण्यात आली. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, या चित्रपटात रश्मिका मंदान्ना या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. साई पल्लवी देखील पुष्पा २ मध्ये सामील होणार आहे. फहद फजिलच्या पहिल्या भागाच्या अखेरीस चित्रपटात पोलीस अधिकारी म्हणून एन्ट्री झाली होती. तो सीक्वेलमध्ये पुष्पाला चांगलाच नडणार हे प्रेक्षकांनी गृहित धरले आहे.
हेही वाचा -Bal Bharat : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लहान मुलांसाठी खुशखबर! ईटीव्ही नेटवर्कच्या ईटीव्ही बाल भारतमध्ये पहा हे अनोखे कार्यक्रम