मुंबई :आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात गोंडस जोडप्यांपैकी एक आहे. हे दोघे सध्या त्यांच्या पालकांची कर्तव्ये आणि व्यावसायिक बांधिलकी उत्तमप्रकारे निभावत आहेत. त्यांची मुलगी राहा हिला जन्म दिल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा अभिनयात पाऊल टाकले आहे. आपण गंगूबाई काठियावाडी अभिनेत्रीला आजकाल तिच्या घराबाहेर अनेकदा पाहत आहोत. काल रात्रीही ती पती रणबीर कपूरसोबत मुंबई प्रेस क्लबमध्ये अनोख्या स्टाईलमध्ये आली होती. दोघांनीही सगळ्यांशी संवाद साधला आणि आपले मन मोकळे केले. आलियाने केसरीया गाणे गायले. रणबीरने तिला गाण्यात मदत केली.
आलिया भट्टने गायले केसरीया गाणे :व्हायरल भयानीने पोस्ट केलेल्या व्हिडिओत आलिया भट्ट रणबीर कपूरला गाण्यास सांगत होती. ती त्याला म्हणते, 'बेटा गाना गाओ' ज्यावर रणबीर हसतो आणि तिला गाण्यास सांगतो. मग अभिनेत्री प्रेक्षकांना विचारते, 'कौनसा गाना गाऊँ आपके लिए?' प्रेक्षक तिला केसरीया गाण्याची मागणी करतात. ती आनंदाने केसरीया गाणे सुरू करते पण ती मधेच गाणे विसरते. अशा परिस्थितीत रणबीर कपूर तिला साथ देतो.
आलियाला सोशल मीडियावर ट्रोल केले :आलिया भट्टच्या आरआरआर चित्रपटाने इतिहास रचला आहे. हे वाक्य तुम्हाला विचित्र वाटले असेल... पण या शब्दांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकून इतिहास रचणाऱ्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या धमाकेदार गाण्यामुळे आलिया भट्ट सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली दिग्दर्शित राम चरण तेजा-ज्युनियर एनटीआर यांच्या भूमिका असलेल्या 'आरआरआर' या चित्रपटातील नाटू नाटू या सुपरहिट गाण्याने गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकून भारतीय चित्रपटसृष्टी जगभरात गाजवली. त्यानंतर ही बातमी प्रसिद्ध झाली. ती म्हणजे आलिया भट्टच्या 'आरआरआर' चित्रपटाने इतिहास रचला!, ज्यावर सोशल मीडिया यूजर्स नाराज झाले आणि अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
आलिया भट्टचे आगामी चित्रपट :व्यावसायिक आघाडीवर, आलिया भट्ट पुढे करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये दिसणार आहे. त्यात रणवीर सिंह सहकलाकार आहे. ती कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत जी ले जरामध्येदेखील झळकणार आहे. यावर्षी ती गॅल गॅडॉटसोबत हार्ट ऑफ स्टोनमधून हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
रणबीर कपूरचे आगामी चित्रपट : रणबीर कपूर रश्मिका मंदानासोबत अॅनिमल चित्रपटात दिसणार आहे. तो श्रध्दा कपूरसोबत तू झुठी मैं मक्कार या चित्रपटातदेखील आहे.