मुंबई- करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील शेवटचे गाणे पूर्ण करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट काश्मीरमध्ये आहे. रणवीर सिंगसोबत घाटीत शूट करत असताना अभिनेत्री आलियाने तिची मुलगी राहा हिला सोबत घेतले आहे. काश्मीरमधील रॉकी और रानी की प्रेम कहानी 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिच्या मुलीला जन्म दिल्यानंतर आलियाचे पहिले शूट आहे. आई-मुलगी काश्मीरमध्ये असताना, रणबीर कपूरला त्याच्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे.
आलिया रॉकी और रानी की प्रेम कहानी गाण्यासाठी शूट करत असताना, रणबीर त्याच्या आगामी 'तू झुठी में मक्का' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ही पहिलीच वेळ आहे की आलिया आणि राहा रणबीरपासून दूर आहेत आणि नवीन बाबा आधीच आपल्या मुलींना मिस करत आहे. याबद्दल बोलताना रणबीर एका इव्हेंटमध्ये म्हणाला, 'दुर्दैवाने आलिया काश्मीरमध्ये शूटिंग करत आहे आणि राहा सोबत घेऊन गेली आहे. मला दोघांची खूप आठवण येत आहे.'
रणबीर 'शमशेरा' या अॅक्शन ड्रामाने बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर ब्रम्हास्त्र हा चित्रपट यशस्वी ठरला होता. सुरुवातीला या चित्रपटाला बहिष्काराचा समाना करावा लागला होता. मात्र हळूङळू या चित्रपटाने ईपला बॉक्स ऑफिसवर जम बसवला. त्यानंतर हिट चित्रपटाच्या यादीमध्ये ब्रम्हास्त्रचा समावेश झाला. या चित्रपटात पहिल्यांदाच तो आलियाच्या प्रेमात पडला होता. ब्रम्हास्त्रमधील दोघांची केमेस्ट्रीही लाजवाब वाटली होती. आता पन्हा एकदा 'तू झुठी मैं मक्का' सोबत रोम-कॉम जॉनरमध्ये परतत आहे. आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन करत आहेत आणि यात श्रद्धा कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे. तू झुठी में मक्का ८ मार्चला मोठ्या पडद्यावर येणार आहे.
रणबीरकडे संदीप रेड्डी वंगा यांचा क्राईम थ्रिलर अॅनिमल हा चित्रपटदेखील आहे. या चित्रपटात अभिनेता यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे ज्यात अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, तृप्ती दिमरी आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपटअॅक्शन, रोमान्स, बदला आणि ड्रामाने भरलेली पिता-पुत्राची कथा आहे.
हेही वाचा -Mangali Sung Marathi Song : विरजण चित्रपटाचे म्यूझिक लॉन्च, साऊथ स्टार गायिका मंगलीने केले मराठीत पार्श्वगायन