महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आलिया भट्टला इव्हेंटमध्ये टोपण नावानं हाक मारल्यानंतर तिनं दिली 'ही' प्रतिक्रिया - आलिया भट्ट मरून शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली

Alia Bhatt : आलिया भट्ट 'जीक्यू मेन ऑफ द इयर' इव्हेंटमध्ये मरून शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. पापाराझी तिला तिच्या टोपण नावानं हाक मारली त्यानंतर तिनं दिलेली प्रतिक्रिया सर्वांचं लक्ष वेधून गेली.

आलिया भट्ट
Alia bhatt

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 12:19 PM IST

मुंबई - Alia Bhatt :आलिया भट्ट हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया भट्टनं तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक सुपर हिट चित्रपट दिले आहेत. अलीकडेच 'गंगूबाई काठियावाडी'मधील दमदार अभिनयासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरविण्यात आलं होतं. दरम्यान ती मुंबईतील एका हॉटेलमध्ये जीक्यूच्या मेन ऑफ द इयर इव्हेंटमध्ये दिसली. आलिया भट्टला जेव्हा पापाराझीनं तिच्या टोपण नावानं हाक मारली, तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तिच्या चेहऱ्यावर वेगळे हावभाव दिसून आले. यामध्ये ती खू क्यूट दिसली. आता तिचे या कार्यक्रमामधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आलिया भट्टचं लूक: आलियानं शॉर्ट मरून प्ले शूटसह हाय हील लोफर्स परिधान केले होते. एकंदरीत तिचा लूक एकदम क्लासी होता. जीक्यू इंडियाचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट आणि पापाराझी विरल भयानी यांनी कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवरील व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आलियाचे चाहते तिचे कौतुक करत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पापाराझी आलियाला मजेदार नावानं हाक मारत तिला 'आलू जी' म्हणत आहेत. आलियानं हे नाव ऐकताच त्यावर प्रतिक्रिया देत म्हटलं, 'हे काय आहे आलू जी, आलू जी?' त्यानंतर ती हसली. तिचं असं बोलणं चाहत्यांना खूप आवडलंय.

आलिया भट्ट वर्क फ्रंट : आलिया भट्टच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटी करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. आलिया सध्या वासन बालाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात आलिया केवळ मुख्य नायिकाच नाही तर ती करण जोहरसोबत सहनिर्मातीही आहे. याशिवाय ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे

हेही वाचा :

  1. ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील कलाकारांच्या नावांची घोषणा
  2. 'फूल और कांटे'ची 32 वर्षे : प्रेक्षकांनी उधळली पैशांची नाणी, अजय देवगणनं केलेय फ्रेम
  3. कार्तिक आर्यनच्या एक्स गर्लफ्रेंडनं वाढदिवसानिमित्त केली खास पोस्ट शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details