मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच मुंबई विमातळावर स्पॉट केल्या गेले. आलिया ही तिच्या हॉलिवूड डेब्यू चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ब्राझीलमध्ये गेली होती. सोमवारी ती मुंबईत परतली. आलियाला पापाराझी विमातळावर स्पॉट केले. त्यानंतर आलियाचा विमानतळावरील व्हिडिओ हा पापाराझीने त्यांच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हायरल झाल्या व्हिडिओत तिने पांढर्या ग्राफिक टी-शर्टवर आणि आई-फिट जीन्सवर लांब डेनिम जॅकेट घातले होते. यावर तिने ऑफबीट सनग्लासेस देखील घातला होता. याशिवाय तिने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स देखील घातले होते. तसेच तिने खांद्यावर एक गुच्चीची बॅग घेतली होती. या बॅगची किंमत 3,68,777 रुपये इतकी आहे. या लूकमध्ये आलिया फार सुंदर दिसत आहे.
आलियाचा जबरदस्त लूक :तिच्या या विमानतळावरील व्हिडिओवर फार जास्त प्रमाणात चाहत्यांच्या कमेंट आल्या आहे. इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने कमेंट केली, 'गुच्ची गर्ल' तर दुसरा म्हटले, 'ती बॅग माझ्या वार्षिक कमाईच्या अर्धी आहे' तसेच आणखी एका चाहत्याने म्हटले, ती सुपर क्यूट आहे. या आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसते. तर इतरांनी अनेक रेड हार्ट्स आणि फायर इमोजी टाकले आहे. चाहत्यांनी आलियाच्या ऑल-डेनिम लूकची प्रशंसा केली आहे.