मुंबई - Alia Bhatt Deepfake Video :साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री काजोल आणि कतरिना कैफ यांच्यानंतर आता आलिया भट्टही डीपफेकची शिकार झाली आहे. काल आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये, एआय तंत्रज्ञानाचा वापर करून, आलिया भट्टचा चेहरा एका मुलीच्या चेहऱ्यावर लावण्यात आला. हा व्हिडिओ अश्लील असल्यानं अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. आलिया भट्टचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिनं यावर प्रतिक्रिया दिली. तिनं एक्सवर एक पोस्ट शेअर करून महिलांना जागरूक केलं.
आलिया भट्टनं उचलले हे पाऊल :आलिया भट्टनं तिच्या व्हायरल डीपफेक व्हिडिओकडे दुर्लक्ष न करता तिच्या एक्स-हँडलवर लिहिलं तिनं लिहिलं, 'हर लीगल गाईड' (Her Legal Guide) एनसीडब्ल्यू इंडिया (द नॅशनल कमिशन फॉर वुमन) चा एक अत्यंत आवश्यक उपक्रम आहे. हे अॅप प्रत्येक महिलेनं वापरावं. हे अॅप संवैधानिक कायदा, प्रजनन अधिकार, सीआरपीसी, लैंगिक याविषयी माहिती देते. गुन्हेगारी आणि सायबर गुन्ह्यांबद्दल माहितीसाठी प्रत्येक स्त्रीसाठी उपयुक्त हे अॅप आहे. सुरक्षित आणि जागरूक समाजासाठी आजच सामील व्हा, डाउनलोड करा आणि सक्षम व्हा'. असं तिनं सांगितलं आहे