मुंबई- बॉलिवूडची गंगूबाई आलिया भट्ट सध्या प्रेग्नेंसीच्या काळातून जात आहे. 27 जून रोजी आलिया भट्टने पती रणबीर कपूरसोबत प्रेग्नन्सी असल्याची घोषणा करून चाहत्यांना मोठी खुशखबर दिली होती. आता पुन्हा एकदा आलिया भट्ट तिच्या कामात बिझी झाली आहे. नुकताच ती एका जाहिरातीत पाहायला मिळत आहे. आलियाने या जाहिरातीच्या काही झलक सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या जाहिरातीत हिरवा आणि राखाडी रंगाचा टी शर्ट घातलेला मुलगा हुबेहूब रणबीर कपूरसारखा दिसत आहे.
सोशल मीडियावर खळबळ - जेव्हा चाहत्यांनी आलियाची पोस्ट पाहिली तेव्हा त्यांनी कमेंट्सचा महापूर आणला. एका यूजरने लिहिले की, हा मुलगा हुबेहूब रणबीरसारखा दिसतो. एकाने लिहिले आहे, क्षणभर तो रणबीर कपूरचा वाटला होता. एका चाहत्याने लिहिले की, आलिया तुला नाही वाटत हा मुलगा रणबीर कपूरसारखा आहे.
बेबी मूनसोबत आलिया भट्ट - नुकतेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या बेबी मूनला गेले होते, तिथून आलियाचा एक फोटो समोर आला आहे. नुकतेच हे जोडपे त्यांच्या बेबीमूनवरून परतले आहे. आलिया आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.