मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला नोव्हेंबर 2022 मध्ये मुलगी राहा झाली. यानंतर कपूर कुटुंबाने राहाचे फार सुंदर रित्या त्यांच्या घरी स्वागत केले. रणबीर अनेकदा वडील झाल्याच्या आनंदाबद्दल बोलत असतो. आलियाने अलीकडेच एका मुलाखती दरम्यान सांगितले की, रणबीर हा राहाशी बोलण्याचा सराव कसा करत आहे, याबद्दल खुलासा केला. रोज त्यांच्या घराच्या बाल्कनीत बसून तो आपल्या मुलीशी बोलत असतो. तिला नवीन नवीन शब्द म्हणायला शिकवत असतो. रणबीर रोजचं राहाला फार वेळ देत असतो. काही दिवसांपूर्वी आलियाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर राहासोबत रणबीरचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात रणबीर राहाला हात लावतांना दिसत आहे. आपला फोटो पत्नी घेत आहे, यांची कल्पना रणबीरला नव्हती.
आलियाने केला व्हायरल फोटोमागील कहाणीचा खुलासा : रणबीर आपल्या मुलीसोबत काळ्या-पांढऱ्या पोर्ट्रेटमध्ये प्रेमळपणे पोज देतांना दिसत आहे. आलियाने सांगितले की, रणबीर नेहमी राहाला त्याच्या आवडत्या ठिकाणी घेवून बसत असतो आणि तिच्यासोबत वेळ घालवून आनंद घेत असतो.आलियाने रणबीरसोबत राहाचा एक फोटो कलात्मक पद्धतीने घेतला आहे. तिने या फोटोमागची कहाणी उघड करत म्हटले की, 'राहाला हिरवळ ठिकाण खूप आवडते. ती प्रत्येक गोष्टी तेथील बघत असते. माझे पती तिला वारंवार या ठिकाणी घेऊन जातात आणि तिला तिथे घेवून बसवतात. तिची ती आवडती जागा आहे. रणबीर देखील तिच्या बाजूला बसतो. हिरवळ आणि वाऱ्याची झुळूक पाहत असताना तिच्याशी बोलत असतो, म्हणून तो एक क्षण असतो जो मला बघायला आवडतो. ते दोघे दररोज तिथेचं बसतात'.