महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आलिया भट्टनं रविवारच्या 'आस्क मी एनिथिंग'मध्ये मुलगी राहाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्नांचा केला खुलासा - आलियानं चाहत्यांसाठी सत्राचं केलं आयोजन

Alia Bhatt Ask Me Anything Session: आलिया भट्टनं रविवारी सकाळी 'आस्क मी एनिथिंग' सत्र सुरू केलं होतं. यावेळी चाहत्यांनी तिला मुलगी आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारली. चला तर ताज्या सत्रावर एक नजर टाकूया...

Alia Bhatt Ask Me Anything Session
आलिया भट्टचं आस्क मी एनिथिंग सेशन

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 8:23 PM IST

मुंबई - Alia Bhatt Ask Me Anything Session: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखत आहे. दरम्यान आलियानं तिची मुलगी राहाबाबत काही खुलासे केले आहेत. आलिया नेहमीच तिच्या बिझी शेड्युलमधून तिच्या चाहत्यांसाठी वेळ काढते. आज 17 डिसेंबर रोजी आलियानं रविवारी 'आस्क मी एनिथिंग' हा सत्र आयोजित केला होता. या सेशनदरम्यान, चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले, ज्याची तिनं उत्तरे उत्कृष्ट पद्धतीनं दिली. आलिया भट्टनं रविवारी तिची अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर 'आस्क मी एनिथिंग' या कॅप्शनसह पोस्ट केली आहे.

आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन
आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन
आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन
आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन
आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन
आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन

आलियानं केलं चाहत्यांसाठी सत्राचं आयोजन :आलियाच्या सत्रात, एका चाहत्यानं तिच्या गॅलरीतील 3 फोटोवर प्रश्न विचारली. या प्रश्नाचे उत्तर देताना तिनं तिच्या मित्रीणीच्या लग्नातील फोटो पोस्ट केली. याशिवाय ती राहाला कुठल्या नावानं बोलाविते हे देखील तिनं यावेळी सांगितलं आहे. आलिया भट्ट राहाला या तीन नावांनी हाक मारते. आज सकाळी रविवारी 11 वाजता आलियानं तिच्या चाहत्यांना 'आस्क मी एनीथिंग' सेशनमध्ये, अनेक प्रश्नांनाची उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने तिला विचारले की, ती तिच्या मुलीला प्रेमाने काय म्हणते. यावर उत्तर देताना आलियानं लिहिलं की, ती राहाला प्रेमानं 'राहु', 'रारा' आणि 'लॉलीपॉप' असं संबोधते.

आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन
आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन
आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन
आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन
आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन
आलिया भट्ट आस्क मी एनिथिंग सेशन

अभिनेत्रीला तिच्या मुलीमुळे चिंता का वाटते? :याशिवाय एका सोशल मीडिया यूजरनं आलियाच्या चिंतेशी संबंधित प्रश्न विचारला. या चाहत्यानं लिहून विचारलं की, 'तुझ्या मुलीपासून दूर राहिल्यानंतर तुम्हाला चिंता वाटते की नाही?' यावर राहाची आईनं उत्तर दिली की, ''माझ्या मुलीला सोडणे माझ्यासाठी कधीच सोपे नव्हत. मला वाटते की थोडा वेळ लागेल. राहा माझ्या अनुपस्थितीत कुटुंबासोबत असते. या विचारानं मी दोषी असल्याचं वाटते. नुकताच आलियानं मुलगी राहाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या बर्थडे सेलिब्रेशनच्या काही झलकही तिनं सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. मात्र आजपर्यंत त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा दाखवला नाही. 'कॉफी विथ करण'मध्ये याबद्दल बोलताना आलिया म्हटलं होती की, ती लोकांना कधीच तोंड दाखवणार नाही असे नाही, पण ती अजूनही खूप लहान आहे.

हेही वाचा :

  1. पुष्पा फेम जगदीश प्रताप भंडारीला अटक, तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा केला कबूल
  2. श्रेयस तळपदेच्या तब्येतीत सुधार; लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
  3. मुंबई विमानतळावर शाहरुख खान, अनुष्का शर्मा झाले स्पॉट, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details