महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Alia Bhatt recalls Sam Bahadur story: 'सॅम बहादूर'ची कथा ऐकल्यावर चमकला होता विकी कौशल, आलिया भट्टनं सांगितली आठवण - Alia Bhatt latest news

Alia Bhatt recalls Sam Bahadur story: मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' चित्रपटाच्या टीझरची सध्या खूप चर्ता सुरूय. या चित्रपटाची कथा मेघनानं राझी चित्रपटाच्या सेटवर ऐकवल्याची आठवण आलिया भट्टनं सांगितली. ही कथा ऐकून विकी कौशल भारावून गेला होता.

Alia Bhatt recalls Sam Bahadur story
सॅम बहादूरची कथा ऐकल्यावर विकी कौशल भारावला

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 10:56 AM IST

मुंबई - Alia Bhatt recalls Sam Bahadur story: दिग्दर्शक मेघना गुलजार आगामी 'सॅम बहादूर' या चरित्रपटासाठी सज्ज झालीय. भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात विकी कौशल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारतोय. बहुप्रतीक्षित असलेल्या या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला. या टीझरचं सर्वत्र कौतुक होतंय. टीझरला प्रतिसाद म्हणून अभिनेत्री आलिया भट्टनं इंस्टाग्राम स्टोरीजवर विकी कौशलचं यातील भूमिकेसाठी अभिनंदन केलंय. मेघना गुलजार दिग्दर्शित 'राझी' या चित्रपटात विकी कौशल आणि आलिया भट्टनं एकत्रित काम केलं होतं.

आलिया भट्टनं लिहिलंय, 'मला आठवंत की राझीच्या सेटवर मेघना गुलजारनं आम्हाला सॅमची कथा ऐकवली होती. तिथं बसलेल्या विकीच्या डोळ्यात एके दिवशी सॅम बनण्याची चमक दिसत होती...आणि वॉव...फक्त वॉव. विकी कौशलला या भूमिकेत पाहण्यासाठी उतावीळ झाले आहे.'

आलियाच्या या पोस्टवर विकी कौशलनं त्याच्या इनस्टाग्राम स्टोरीमधून उत्तर दिलं, 'तो दिवस कधीच विसरू शकत नाही. धन्यवाद, आलिया. तू खूप गोड आहेस!' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल आणि लष्करातील धुरंधर पराक्रमी सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल, सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.

टीझरमध्ये, विकी फील्ड मार्शलच्या भूमिकेत दिसतोय आणि सैनिकांच्या फलटणचे नेतृत्व करतोय. तो सैनिकांना आपल्या देशासाठी लढण्यास प्रेरित करतो. 'एक सैनिक के लिए उसकी जान से जादा कीमत होती है उसकी इज्जत...उसकी वर्दी...और एक सैनिक अपनी वर्दी की इज्जत के लिए अपनी जान भी दे सकता है', असे काही दमदार संवादही यामध्ये सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या तोंडी आहेत. या टीझरमध्ये सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांचीही झलक दाखवण्यात आलीय.

'सॅम बहादूर' चित्रपट 1 डिसेंबर रोजी जगभरातील थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. रणबीर कपूरच्या आगामी 'अ‍ॅनिमल' या एक्शन फिल्मसोबत या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

हेही वाचा -

1. Rajkummar Rao And Patralekha : राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखाचा रोमँटिक व्हिडिओ झाला व्हायरल; पहा व्हिडिओ...

2. Rahul Chopra In Role Of Nitin Gadkari : 'गडकरी' चित्रपटामध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार राहुल चोपडा

3. Sam Bahadur Teaser: मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर टीझर'मध्ये विकी कौशलवर खिळल्या सर्वांचा नजरा

ABOUT THE AUTHOR

...view details