महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Alia bhatt Pregnant : आलिया-रणबीर कपूर रुग्णालयात दाखल, कपूर कुटुंबात लवकरच हलणार पाळणा - Maternity Leave

बॉलीवूड जोडपे आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्यांच्या होणाऱ्या बाळामुळे चर्चेत आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांना एवढे मोठे सरप्राईज दिले. आलिया भट्ट प्रसूतीसाठी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आलिया सर एच एन रिलायंस रुग्णालयात ( Sir H. N. Reliance Foundation Hospital ) बाळाला जन्म देणार आहे.

Alia bhatt Pregnant
आलिया - रणबीर कपूर रुग्णालयात दाखल

By

Published : Nov 6, 2022, 12:05 PM IST

मुंबई:बॉलीवूड जोडपे आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्यांच्या होणाऱ्या बाळामुळे चर्चेत आहे. कपूर कुटुंबात लवकरच पाळणा हलणार आहे. आलिया भट्ट प्रसूतीसाठी (Alia bhatt Pregnant) रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आलिया सर एच एन रिलायंस रुग्णालयात ( Sir H. N. Reliance Foundation Hospital ) बाळाला जन्म देणार आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांना एवढे मोठे सरप्राईज दिले.

कारमधून हॉस्पिटलमध्ये येताना दिसले:हे जोडपे त्यांच्या कारमधून हॉस्पिटलमध्ये येताना दिसले. या जोडप्याने या वर्षी जूनमध्ये त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली. 'ब्रह्मास्त्र' (Bramhastra Movie) जोडप्याने 14 एप्रिल 2022 रोजी रणबीरच्या मुंबईतील निवासस्थानी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न गाठ बांधली. जेव्हापासून या जोडप्याने त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली, तेव्हापासून चाहते कपूर कुटुंबाकडून (Kapoor Family) चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत.

अ‍ॅक्शन चित्रपटात एकत्र दिसले:दरम्यान, आलिया आणि रणबीर नुकतेच 'ब्रह्मास्त्र: भाग 1- शिवा' या अ‍ॅक्शन चित्रपटात एकत्र दिसले होते, ज्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. 'ब्रह्मास्त्र' आता OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar वर प्रवाहित होत आहे.

आलिया भट्ट्ट ब्रेक घेणार: अभिनेत्री आलिया भट्ट्ट बाळाच्या जन्मानंतर मॅटरनिटी लीव्हवर (Maternity Leave) जाणार आहे. आलिया एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. जास्तीत जास्त वेळ बाळासोबत घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे.

आलिया भट्टचे आगामी चित्रपट: आलिया भट्टच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आता आलिया भट्ट-रणबीर कपूरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर आलिया भट्ट आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज आहे. तिचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाने सिनेमागृहाच चांगलाच धुमाकूळ घातला. दरम्यान, रणबीर पुढे दिग्दर्शक लव रंजनच्या पुढच्या अनटाइटल्ड रोमँटिक कॉमेडी चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या गँगस्टर ड्रामा फिल्म 'अ‍ॅनिमल' मध्ये रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details