महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Alia bhatt : पापराझीची हरवलेली चप्पल आलिया भट्टने उचलली, सोशल मीडियावर झाली ट्रोल - ALIA BHATT chappal

रेस्टॉरंटमधून बाहेर आल्यानंतर आलिया भट्टला पापाराझीने घेरले. आलियाच्या गाडीजवळ चप्पल पडली होती. आलियाची नजर या चप्पलवर पडताच तिने ती चप्पल हातातून उचलली आणि विचारले ही कोणाची आहे? दरम्यान आता सोशल मीडियावर यूजर्स याला आलिया भट्टचा ड्रामा म्हणत आहेत.

Alia bhatt
आलिया भट्ट

By

Published : Jul 14, 2023, 10:51 AM IST

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २८ जुलै, २०२३ रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तसेच आलियाला चित्रपटसृष्टीत तिच्या क्यूटनेससाठी इन्डस्ट्रीमध्ये ओळखल्या जाते. याशिवाय ती अनेकदा बाहेर देखील आपल्या कुटुंबासोबत दिसते. दरम्यान मुंबईमध्ये काल रात्री आलिया भट्ट तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टसोबत डिनर गेली असताना तिने असे काही केले की, ज्यामुळे आलियाची चर्चा ही सोशल मीडियावर होत आहे.

काय केले आलियाने :आलिया भट्टला काल रात्री रेस्टॉरंटमधून निघताना पापाराझीने स्पॉट केले. यावेळी आलिया ही कॅज्युअल लूकमध्ये दिसली तिने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा टॉपसह काळ्या रंगाचा बेल बॉटम परिधान केला होता या लूकमध्ये ती फार सुंदर दिसत होती. या व्हिडिओमध्ये आलिया ही आपल्या आईचा हात पकडून चालताना दिसत आहे. तसेच व्हिडिओत आलिया ही फोटोग्राफरसोबत बोलताना दिसत आहे. दरम्यान व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, आलियाच्या गाडीजवळ चप्पल पडली आहे. त्यानंतर जेव्हा आलियाची नजर या चप्पलवर पडली तेव्हा ती विचारते की हे काय आहे, आणि कोणाचे आहे. त्यानंतर पापाराझी एक कॅमेरामॅन तिला सांगतो की ही त्याची चप्पल आहे. तेव्हा आलिया कुठलाही विचार न करता ती चप्पल आपल्या हातात उचलते आणि विचारते की ही चप्पल कोणाची आहे. त्यानंतर ती तिथे उपस्थित असणाऱ्या एका फोटोग्राफरला ती चप्पल देते.

आलिया व्हिडिओ व्हायरल :आलिया भट्टचा हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा तिच्या चाहत्या तिचे फार कौतुक केले. आलियाच्या या व्हिडिओवर भरभरून कमेंट येत आहे. आलियाच्या एका चाहत्याने कमेंट देत म्हटले, 'ती गोड आहे'... तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले, ही खूप क्यूट आहे. आणखी एकाने म्हटले, 'आलिया ही नेहमी गोड आणि चांगली वागते'. याशिवाय आलियाला या व्हिडिओसाठी ट्रोल देखील करण्यात आले आहे. एका नेटकऱ्याने लिहले, 'त्याच हाताने किस करत आहे'. तर आणखी दुसऱ्या चाहत्याने म्हटले की, 'आलिया तू किती ड्रामा करते', अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहे.

हेही वाचा :

  1. Akshay kumar : फ्लॉपच्या भितीपोटी अक्षय कुमारने 'ओ माय गॉड २' साठी घेतला 'हा' निर्णय?
  2. Samantha wrap Citadel :सामंथाने पूर्ण केली निर्मात्यांना दिलेली वचनं, उपचारांपूर्वी संपवली सर्व शुटिंग्स
  3. Ajmer 92 teaser : अजमेर ९२ चा टीझर रिलीज, प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद

ABOUT THE AUTHOR

...view details