मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच चाहत्यांना खुशखबर देणार आहे का? आलिया भट्ट आई होणार आहे का? खरंतर, अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून चाहत्यांचे चेहरे फुलू लागले आहेत. आलिया भट्टने सोमवारी दोन फोटो शेअर केले, ज्यात ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. त्यावेळी तिचा पती रणबीर कपूर आलियासोबत कॅप घालून बसला आहे. दोघेही समोरच्या अल्ट्रासाऊंड मशीनकडे पाहत आहेत, ज्यामध्ये हृदय दिसत आहे.
त्यांनी शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत सिंहाचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. हे फोटो शेअर करत आलिया भट्टने लिहिले आहे की, 'आमचे बाळ... लवकरच येत आहे'. आलिया भट्टने याचवर्षी १४ एप्रिल रोजी बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केले होते. रणबीर आणि आलियाच्या लग्नाला अडीच महिने झाले असून या जोडप्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.