महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Alia bhatt meets mother of a paparazzo: पापाराझीच्या आईसोबत झालेल्या भेटीमुळे आलिया भट्टने नेटकऱ्यांची जिंकली मने - प्रबल गुरंग

मेट गाला 2023 मधून नंतर आलिया भट्टच्या चाहत्यांची संख्यामध्ये वाढ झाली आहे. पापाराझीच्या आईसोबत झालेल्या आलियाच्या भेटीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

Alia bhatt
आलिया भट्ट

By

Published : May 8, 2023, 11:31 AM IST

मुंबई: एका सेलिब्रिटीचा छोटासा हावभाव नेटिझन्सची मने जिंकत असतो. रविवारी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान आलिया भट्टने पापाराझीच्या आईची भेट घेतली. त्यानंतर या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक यूजर्सने या व्हिडिओ शेअर आणि लाईक केल आहे.या व्हिडिओमध्ये आलिया महिलेशी हसतांना बोलतांना दिसत असून 'बडा अच्छा लगा आपसे मिलके' म्हणताना दिसत आहे. फोटोग्राफरकडे बोट दाखवत आलिया महिलेला म्हणाली, 'तुझा मुलगा मला खूप त्रास देतो. तुमचा मुलगा मला चिडवत राहतो, पण तो त्याच्या कामात सर्वोत्कृष्ट आहे. या कार्यक्रमात आलिया तिच्या कॅज्युअल लूकमध्ये दिसली.

मेट गाला 2023 :आलियाने पांढरी- टीशर्ट आणि निळा रंगाचा डेनिम घातला शिवाय तिने तिचे केस हे मोकळे सोडले होते. या वेळी आलिया दिसायला फार देखणी दिसत होती. आलियाने गेल्या आठवड्यातच मेट गाला 2023 मध्ये तिने भव्य पदार्पण केले. तिने मेट गाला 2023मध्ये पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता या गाऊनवर शुभ्र मोत्याचं वक्र असून या गाऊनमध्ये आलिया फार सुंदर दिसत होती. या ड्रेसबद्दल लिहतांना आलियाने लिहले, 'मेट गाला, कार्ल लेजरफेल्ड सौंदर्य आहे. मी नेहमीच प्रतिष्ठित चॅनेल ब्राइड्स आकर्षित होते. सीझननंतर सीझन, कार्ल लेजरफेल्डची प्रतिभा सर्वात नाविन्यपूर्ण आणि आश्चर्यकारक पोशाखांमध्ये चमकत असते.

रॉकी और रानी की प्रेम चित्रपट :आज रात्रीचा माझा लूक आणि विशेषत: सुपरमॉडेल क्लॉडिया शिफरच्या 1992 च्या चॅनेल वधूच्या लुकपासून प्रेरित होता. प्रबल गुरुंगला टॅग करत, अभिनेत्रीने लिहिले, की, 'मला तुमच्या कामाचा खूप अभिमान आहे.'आलिया पुढे म्हणाली, 'मुलीकडे जास्त मोती कधीच असू शकत नाहीत. अरे, आणि ते पांढरे आहे.' आलियाच्या कामाबद्दल बोलायला गेलं तर ,ती करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगसोबत तिचा ऑन-स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच यापुर्वी आलिया आणि रणवीर गल्ली बॉय चित्रपटात काम केले होते. यावेळी आलिया आणि रणवीर आपल्या अनोख्या अंदाजात पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरमध्ये आलिया आणि रणवीर हे रोमांन्स करताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेक्षकांना आलिया आणि रणवीरमधील केमेस्ट्री बघायला रूपेरी पडद्यावर दिसेल.

हेही वाचा :Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने केले सार्वजनिक ठिकाणी 'असे' कृत्य, म्हणाली, त्याची मला लाज वाटते...

ABOUT THE AUTHOR

...view details