मुंबई :साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार राम चरण लवकरच वडील होणार आहेत. राम चरण यांची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला गर्भवती असून ती लवकरच पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. लग्नाच्या 11 वर्षांनंतर राम आणि उपासना यांना आई-वडील होण्याचा आनंद मिळणार आहे. अलीकडेच या जोडप्याने दुबईमध्ये बेबी शॉवर फंक्शन केले. या सोहळ्यात जोडप्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी सहभागी झाली होती. राम चरणची पत्नी उपासना हिचा बेबी शॉवर बीच थीमवर होता. राम चरणची सहअभिनेत्री आलिया भट्टने उपासनाला भेट म्हणून एक अतिशय सुंदर गोष्ट पाठवली आहे. आलिया भट्ट आरआरआरमध्ये राम चरणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
सुंदर भेट सोशल मीडियावर शेअर :आलियाने उपासनाच्या मुलासाठी पाठवलेल्या भेटवस्तूमध्ये आलियाच्या स्वतःच्या मुलांच्या ब्रँडचे कपडे आहेत. आलियाकडून मिळालेली सुंदर भेट सोशल मीडियावर शेअर करत उपासनाने आलिया भट्टचे आभार मानले आहेत. उपासनाने आलियाला थँक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मला जे हवे होते ते तू दिलेस, धन्यवाद'. आलियाने याआधी बिपाशा बसूची मुलगी देवी सिंहसाठी अशी सुंदर भेट पाठवली होती आणि बिपाशाने सोशल मीडियावर आलियासाठी थँक्स नोट लिहिली होती.