मुंबई- निर्माता करण जोहरने चार वर्षांनंतर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या रोमँटिक-ड्रामा चित्रपटासाठी कॅमेरा उचलला होता. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर स्वतः करत होता. आता चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याची बातमी येत आहे. यामागचे कारण आलिया भट्टची प्रेग्नेंसी असल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहरने आलिया भट्टची प्रेग्नेंसी लक्षात घेऊन चित्रपटाचे काही शेड्यूल वाढवली आहेत. ऑगस्टमध्ये शूट सुरू होणार होते. आता हे सीन्स आता आलियाच्या डिलिव्हरीनंतरच शूट होणार असल्याचं बोललं जात आहे. करण जोहरचा हा चित्रपट फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण होणार होता, ज्याला आता विलंब होऊ शकतो.