महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार स्टारर 'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी 3' अडचणीत - हेरा फेरी 3

Akshay kumar : अभिनेता अक्षय कुमारचे आगामी चित्रपट 'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी 3' अडचणीत सापडले आहेत. चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्यावरून जिओ आणि फिरोज नाडियादवाला यांच्यात वाद सुरू असल्याचं समजत आहे.

Akshay kumar
अक्षय कुमार

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 5:35 PM IST

मुंबई - Akshay kumar :अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी दोन वाईट बातम्या आहेत. 'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी 3' चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्यावरून जिओ आणि फिरोज नाडियादवाला यांच्यात वाद सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटांना लॉक करण्यात आले आहे. फिरोज नाडियादवाला यांनी अक्षय कुमारच्या या दोन चित्रपटांवर पैसे गुंतवण्यापासून माघार घेतल्याचं समजत आहे. 'वेलकम टू द जंगल' 2024 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार होता . फिरोज यांच्यावर कलाकारांचे धकबाकी असल्याचं बोललं जात आहे, जे त्यांनी अद्याप फेडलेले नाही. याप्रकरणी कायदेशीर कारवाई देखील केली जात असल्याचं समजत आहे.

'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी 3' धोक्यात :दरम्यान जिओ स्टुडिओनं आता 'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी 3' बनवण्यास नकार दिला आहे. अक्षय कुमारनं हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. त्यानं जिओ स्टुडिओच्या मालकाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. वेलकम टू द जंगल'चे शूटिंग फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटाची घोषणा 9 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आली. 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करणार होते. यापूर्वी अनीस बज्मीनं 'वेलकम टू द जंगल' दिग्दर्शित करण्यास नकार दिला होता. 'वेलकम टू द जंगल'च्या कला दिग्दर्शकाचेही निधन झालं आहे.

'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी 3'बद्दल अपडेट : या चित्रपटामधील अभिनेता श्रेयस तळपदे याला नुकताच हृदयविकाराचा झटका आला आहे. दरम्यान ज्या कलाकारांनी फिरोजसोबत काम केले आहे ते त्यांच्या थकबाकीची मागणी करत आहेत. 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाची स्टार कास्ट खूप मोठी होती. या चित्रपटामध्ये दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, अनिल कपूर, रवीना टंडन आणि इतर कलाकार दिसणार होते. हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत होता. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार रवीना टंडनसोबत रुपेरी पडद्यावर 19 वर्षानंतर दिसणार होता. आता हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चाहत्यांना पाहायला मिळणार का हे येणाऱ्या काळात समजेल.

हेही वाचा :

  1. 2023 या वर्षातील सर्वात वादग्रस्त बॉलिवूड आणि साऊथ चित्रपट
  2. संदीप रेड्डी वंगाने दिले 'अ‍ॅनिमल पार्क'च्या संभाव्य शुटिंग शेड्यूलचे संकेत
  3. 'सालार' पाहिल्यानंतर पृथ्वीराज सुकुमारनने दिली 'गॅरंटी', अपेक्षेपेक्षाही असेल जास्त भव्य

ABOUT THE AUTHOR

...view details