महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अक्षय कुमारच्या अनटाइटल्ड चित्रपटाचा फर्स्ट लूक लीक - अक्षय कुमार लेटेस्ट फोटो

अक्षय कुमारच्या ( Akshay Kumar ) आगामी अनटाइटल्ड चित्रपटाचा फर्स्ट लूक लीक झाला आहे. लीक झालेल्या फोटोत खिलाडी अभिनेता पंजाबी व्यक्तीरेखेच्या ( Punjabi character ) भूमिकेत दिसत आहे. अक्षयने त्याच्या भूमिकेसाठी पूर्ण वाढलेली दाढी देखील ठेवली आहे.

अक्षय कुमार
अक्षय कुमार

By

Published : Jul 9, 2022, 11:40 AM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ( Akshay Kumar ) आगामी अनटाइटल्ड चित्रपटाचा फर्स्ट लूक लीक झाला आहे. लीक झालेल्या फोटोत खिलाडी अभिनेता पंजाबी व्यक्तीरेखेच्या ( Punjabi character ) भूमिकेत दिसत आहे. यात तो मोहरीच्या शेतात उभा असून चेहऱ्यावर एक उग्र रूप दिसत आहे. अक्षयने स्ट्रीप केलेला फिकट निळा शर्ट आणि डोक्यावर मरून पगडी घातली आहे. अक्षयने त्याच्या भूमिकेसाठी पूर्ण वाढलेली दाढी देखील ठेवली आहे.

अक्षय कुमार अभिनीत चित्रपटाचे शीर्षक अद्याप घोषित झालेले नाही. या चित्रपटाची निर्मिती पूजा करीत आहे. अधिकृत वृत्तानुसार, चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरू होणार आहे. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित, अक्षय कुमार स्टारर हा चित्रपट कोळसा खाणीतील बचाव मोहिमेच्या कथेभोवती फिरतो. अक्षयचा वेधक लुक खरंच खूप वेगळा आणि जिज्ञासा वाढवँणारा आहे.

अक्षय कुमार दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या ऐतिहासिक सम्राट पृथ्वीराजमध्ये शेवटचा दिसला होता. यात तो माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसोबत दिसला होता. यशराज प्रॉडक्शनने याची निर्मिती केली होती. हा चित्रपट या वर्षी 3 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संजय दत्त आणि सोनू सूद यांच्याही भूमिका होत्या.

त्याशिवाय अक्षय कुमार कॉमेडी-ड्रामा रक्षाबंधन चित्रपटाचाही एक भाग आहे. आनंद एल राय दिग्दर्शित आणि हिमांशू शर्मा आणि कनिका धिल्लन लिखित या चित्रपटाची निर्मिती कलर येलो प्रॉडक्शन्स, झी स्टुडिओ आणि अलका हिरानंदानी यांनी केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहकार्याने केली आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर, साहिल मेहता आणि दीपिका खन्ना यांच्याही भूमिका आहेत. यावर्षी 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

हेही वाचा -'आलिया भट्ट अद्भुत प्रतिभा असलेली एक महान व्यक्ती' हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोट

ABOUT THE AUTHOR

...view details