मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मंगळवारी त्याच्या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट राम सेतूच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नुश्रत भरुच्चा आणि सत्य देव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
ट्विटरवर अक्षयने राम सेतूचा ट्रेलर शेअर केला ज्यात त्याने कॅप्शन दिले, "तुम्हाला राम सेतूची पहिली झलक आवडेल... आशा आहे की तुम्ही ट्रेलरला आणखी प्रेम दाखवाल. रामसेतू २५ ऑक्टोबर रोजी जगभरातील फक्त थिएटरमध्ये."
बहुप्रतिक्षित पुरातत्वशास्त्रज्ञ आर्यन कुलश्रेष्ठ (अक्षय कुमार) कसा आस्तिक बनला, दुष्ट शक्तींनी भारताच्या वारशाचा स्तंभ नष्ट करण्याआधी पौराणिक राम सेतूचे खरे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्याने काळाशी दिलेली झुंज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्विस्ट आणि टर्नच्या जोरदार सर्व्हिंगसह अॅक्शन अॅडव्हेंचर, राम सेतू ट्रेलर दर्शकांना गुंतवून ठेवण्याचे आणि मनोरंजन करण्याची खात्री देतो. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असे या चित्रपटाचे स्वरुप आहे.
हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. राम सेतू या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर थँक गाड या अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर कॉमेडी चित्रपटाशी टक्कर होणार आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर राम सेतू चित्रपट लवकरच Amazon प्राइम सदस्यांसाठी देखील उपलब्ध होईल.
या चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटिया (केप ऑफ गुड फिल्म्स), विक्रम मल्होत्रा (अबंडंटिया एंटरटेनमेंट), सुबास्करन, महावीर जैन, आणि आशिष सिंग (लाइका प्रॉडक्शन) आणि प्राइम व्हिडिओचे डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून केली आहे. 'राम सेतू' झी स्टुडिओजद्वारे जगभरातील थिएटरमध्ये वितरित केला जाईल.
दरम्यान, अक्षय दिग्दर्शक राज मेहता यांच्या आगामी सेल्फीमध्ये इमरान हाश्मी, नुश्रत भरुच्चा आणि डायना पेंटी यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय, त्याच्याकडे राधिका मदान, आनंद एल रायचा 'गोरखा' आणि टायगर श्रॉफसोबत बडे मियाँ छोटे मियाँ या दक्षिणेतील सूरराई पोत्रूचा अधिकृत हिंदी रिमेकही आहे.
हेही वाचा -Big B B'day: बॉलिवूड सेलेब्रिटींचा बिग बीवर शुभेच्छांचा वर्षाव