महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'मधील पहिले गाणे रिलीज - अक्षय कुमार भूमी पेडणेकर

अक्षय कुमारच्या आगामी 'रक्षा बंधन' या चित्रपटातील पहिले गाणे 'तेरे साथ हूं मैं' बुधवारी रिलीज झाले.

अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'मधील पहिले गाणे रिलीज
अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'मधील पहिले गाणे रिलीज

By

Published : Jun 30, 2022, 11:26 AM IST

मुंबई - अक्षय कुमारच्या आगामी 'रक्षा बंधन' या चित्रपटातील पहिले गाणे 'तेरे साथ हूं मैं' अखेर रिलीज झाले. अक्षयने इंस्टाग्राम हँडलवर त्याच्या बहुप्रतिक्षित 'रक्षा बंधन' चित्रपटाच्या गाण्याचा टीझर शेअर केला.

व्हिडीओ शेअर करताना अक्षयने कॅप्शन दिले की, "भावंडं आयुष्यात कधीच एकटी नसतात, त्यांचा हात पकडण्यासाठी भाऊ किंवा बहिण असते. हेच बंधन साजरा करण्यासाठी 'तेरे साथ हूं मैं' हे रक्षा बंधनमधील गाणे."

किंवा बहीण त्यांचा हात धरून जीवनात कधीच एकटे फिरत नाही. आत्ताच # रक्षाबंधन मधील # तेरे साथ हूमैं या आमच्या गाण्याने हा सुंदर बंध साजरा करा!"

2-मिनिट 54-सेकंद लांबीचे गाणे भाऊ आणि बहिणींमधील प्रेम, बंध आणि घट्ट नाते दर्शवते. बहिणीचे लग्न होत असतानाचे जबरदस्त क्षण दाखवणारे हे भावनिक गाणे आहे. आनंद एल राय दिग्दर्शित आणि हिमांशू शर्मा आणि कनिका धिल्लन यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती कलर येलो प्रॉडक्शन, झी स्टुडिओ, अलका हिरानंदानी यांनी केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहकार्याने केली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -मानसी नाईकच्या किलर लूकने चाहते घायाळ पाहा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details