मुंबई :बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार 'ओएमजी २' मुळे सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज झाला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अक्षयचा 'ओएमजी २' चित्रपट १०० कोटी क्लबकडे वाटचाल करत आहे. याशिवाय दुसरीकडे, 'ओएमजी २' सोबत 'गदर २' चित्रपट देखील रिलीज झाला होता. 'गदर २' हा चित्रपट कमाईच्या बाबतीत 'ओएमजी २' पेक्षा पुढे आहे. आता 'खिलाडी'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमारचे २०२४ मध्ये एकापाठोपाठ एक चित्रपट येणार आहेत. २०२४ मध्ये अक्षय कुमारचे तीन मोठे चित्रपट ईद, दिवाळी आणि ख्रिसमसला रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहेत, ही अक्षयच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी असणार आहे.
'बडे मियाँ छोटे मियाँ' कधी रिलीज होणार :१० एप्रिल २०२४ रोजी ईदच्या दिवशी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' रिलीज होणार आहे. हा चित्रपट अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला आहे.
हाऊसफुल ५ कधी रिलीज होणार :अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल ५' २०२४ च्या दिवाळीला धमाका करायला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख व्यतिरिक्त अनेक स्टार्स कॉमेडीचा धडाका लावताना दिसणार आहेत.