मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाद्वारा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट 2024मध्ये ईदला रिलीज होणार आहे. अली अब्बास जफरचा दिग्दर्शीत 'सुलतान' आणि 'भारत' नंतर हा चित्रपट तिसरा चित्रपट असणार आहे जो ईद रिलीज होणार आहे. चित्रपटात मल्याळम स्टार पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे तर मुख्य भूमिकेत सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ या असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अधिकृत घोषणा होणे बाकी असली तरी, पूजा एंटरटेनमेंट 2024 मध्ये ईदच्या वीकेंडसाठी अॅक्शन-पॅक एंटरटेनमेंट रिलीज करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अक्शन, कॉमेडी आणि रोमांस तडका असणार आहे.
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ : 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सारख्या अॅक्शन एंटरटेनिंग चित्रपटाला रिलीज करण्यासाठी ईद हा एक योग्य प्रसंग असू शकतो असे या बॅनरला वाटते. पूजा एंटरटेनमेंट या बॅनरखाली वाशू भगनानी आणि जॅकी भगनानी यांनी हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा अॅक्शन चित्रपट म्हणून सादर करणार असून हा चित्रपट मनोरंजक असणार असे दिसत आहे. या चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन सर्वात मोठे अॅक्शन स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग ही भारतात झाली आहे आणि सध्याला या चित्रपटाची शुटिंग ही युरोप आणि यूएईमधील नयनरम्य ठिकाणी करत आहेत आणि काही दिवसांत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होणार असून हा चित्रपट लवकरचं प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.