महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रत्येक वाढदिवसाला कृतज्ञ वाटते म्हणत, अक्षय कुमारने मानले चाहत्यांचे आभार - प्रत्येक वाढदिवसाला कृतज्ञ

अक्षय कुमारने ( Akshay Kumar ) त्याच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा ( birthday wishing ) दिल्याबद्दल त्याचे सर्व चाहते आणि खास नातेवाईक आणि मित्रांचे आभार ( thanks friends ) मानले आहेत.

Etv Bharat
अक्षय कुमारने मानले चाहत्यांचे आभार

By

Published : Sep 9, 2022, 5:18 PM IST

मुंबई - अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त ( Akshay Kumar birthday ) एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. अक्षय कुमार 9 सप्टेंबर रोजी 55 वर्षांचा झाला असून तो आजही सक्रिय आहे. आजही देखणेपणात कोणताही अभिनेता त्याच्या पुढे उभा राहू शकत नाही. एका वर्षात जवळपास 4 ते 5 चित्रपट करणाऱ्या अक्षय कुमार ( Akshay Kumar ) ही पोस्ट खूप बोलकी आहे.

अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'वर्ष निघून जातात, वेळ निघून जातो, जे काही स्थिर राहते ती कृतज्ञता आहे, जी मला प्रत्येक वाढदिवसाला जाणवते, तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी नेहमीच धन्यवाद'. अक्षय कुमारने काही मिनिटांपूर्वी ही पोस्ट शेअर केली होती.

यापूर्वी टायगर श्रॉफने अक्षय कुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर केली होती. अक्षयला शुभेच्छा देताना टायगरने लिहिले की, ''मोठ्याच्या मोठ्या वाढदिवसाला छोट्याची छोटी शुभेच्छा. हॅप्पी बर्थ डे अक्षय कुमार सर.'' या पोस्टसह, टायगरने चित्रपटाशी संबंधित एक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन्ही स्टार्स बंदुकांसह पूर्ण स्वॅगमध्ये उभे आहेत.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याचे करिअर अडचणीत आलेले दिसते. या वर्षी अक्षय कुमारने सलग चार फ्लॉप चित्रपट दिले आहेत. एकाही चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर चालली नाही. यामध्ये 'बच्चन पांडे', 'रक्षा बंधन' आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'कटपुतली' या चित्रपटाचा समावेश आहे. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे अक्षय कुमारच्या प्रदीर्घ कारकिर्दीवर संकटाचे ढग घिरट्या घालू लागले आहे.

हेही वाचा -अनुपम खेर आणि नीना गुप्ताची भूमिका असलेल्या शिव शास्त्री बलबोआ चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी

ABOUT THE AUTHOR

...view details