मुंबई - Mission Raniganj teaser out : 'ओएमजी 2' चित्रपटानंतर अक्षय कुमार आता आगामी चित्रपट 'मिशन राणीगंज'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आज म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कहाणी ही सत्य घटनवारवर आधारित असून या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज झाले होते. या चित्रपटातील अक्षय कुमारचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारचा लूक हा हटके अंदाजात दिसणार आहे. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'मिशन रानीगंज'चा टिझर हा प्रदर्शित झाला आहे. 'मिशन राणीगंज'चे दिग्दर्शन टिन्नू सुरेश देसाई यांनी केले असून पूजा एंटरटेनमेंटद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
'मिशन रानीगंज'चा टिझर रिलीज : अक्षय कुमारच्या या चित्रपटाचे आधीचे नाव 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' असे होते. मात्र आता ते 'मिशन राणीगंज' असे बदलण्यात आले आहे. यापूर्वी या चित्रपटासाठी कोणतीही टॅगलाइन नव्हती, परंतु आता चित्रपटाच्या शीर्षकात एक टॅगलाइन जोडली गेली आहे. 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' च्या जागी 'भारत' अशी टॅगलाइनही देण्यात आली आहे. भारत सरकारने 'इंडिया' ऐवजी 'भारत' हे नाव वापरण्याचा आग्रह सुरू केल्यानंतर अक्षयने देखील चित्रपटाच्या शीर्षकात 'भारत' हा शब्द जोडणार असल्याचे समजत आहे.