मुंबई- अक्षय कुमार ( Akshay Kumar ) महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार ( Akshay play role of Chhatrapati Shivaji Maharaj ) आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात'ची निर्मिती वसीम कुरेशी करत आहेत. इतिहासाच्या सर्वात गौरवशाली पानांपैकी एक लिहून शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे एकमेव ध्येय असलेल्या सात शूर योद्ध्यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाल्याचे ट्विटरवरुन कळवले आहे. त्यांनी लिहिलंय, ''छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असलेल्या अक्षय कुमार अभिनित व महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या शुटिंगला आज सुरुवात होत आहे. ''
दरम्यान, अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेट अपमधील व्हिडिओ पोस्ट केला आहे. यातून महाराजांची दमदार झलक पाहायला मिळत आहे. परंतु व्हिडिओच्या अखेरीस झुंबर दिसत असून यात लागलेले विद्युत दिवे खटकणारे आहेत. याच्या कॅप्शनमध्ये अक्षयने, जय भवानी, जय शिवाजी ! असे लिहिले आहे.