महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Dhadkan 2 : 'धडकन'चा सीक्वल लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला; दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी दिली अपडेट... - धर्मेश दर्शन

Dhadkan 2 : 'गदर 2'चं यश पाहिल्यानंतर आता 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'धडकन'चा सीक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी एका मुलाखतीत याविषयी माहिती दिली आहे.

Dhadkan 2
धडकन 2

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 3:10 PM IST

मुंबई Dhadkan 2 : सध्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटाचे सीक्वल तयार केले जात आहेत. 'गदर एक प्रेम कथा'चा सीक्वल 'गदर 2'नं बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला. दरम्यान आता आणखी एका चित्रपटाबाबत एक बातमी समोर येत आहे. 'गदर 2'चं यश पाहिल्यानंतर आता 2000 साली प्रदर्शित झालेल्या आणखी एका सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. सुनील शेट्टी, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि महिमा चौधरी स्टारर 'धडकन' चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजत आहे. 'धडकन' हा लव्ह ट्रॅंगलं आधारित चित्रपट होता.

'धडकन'चा सीक्वल :या चित्रपटातील गाणी आणि संवाद त्या काळात खूप पसंत केले गेले होते. या चित्रपटातील संवाद आजही सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी 'धडकन 2'च्या निर्मितीवर प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात त्यांनी एका मुलाखतीत चर्चा केली आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, 'मी या क्षणी म्हणू शकतो की हो, मला 'धडकन 2'ची ऑफर रतन जैनकडून मिळाली आहे, जे 'धडकन'चे निर्माते होते. अनेक दशकांपासून ते मला चित्रपटांची ऑफर देत आहेत. कारण, 'धडकन' हा क्लासिक चित्रपट आहे.

दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी दिली मुलाखत : धर्मेश दर्शन यांनी पुढं सांगितलं. धडकन हा अ‍ॅक्शन एंटरटेनर किंवा कॉमिक चित्रपट नाही. हा चित्रपट भावनांनी भरलेला आहे. 'गदर 2'च्या प्रचंड यशानंतर लोक खूप आनंदी आहेत. त्यामुळं मला 10-15 दिवसांत पुन्हा एकदा 'धडकन 2' बनवण्याची ऑफर आली आहे. हा चित्रपट बनवणार असल्याचं मी निर्मात्याला स्पष्ट केलं. मला माहीत नाही की 'धडकन 2' किती मोठा हिट होईल. कारण, चित्रपटाच्या पहिल्या भागाबाबतही मला खात्री नव्हती. त्यानंतर त्यांनी अ‍ॅक्शन हिरो सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांचा उल्लेख देखील यावेळी केला. आता 'धडकन 2'च्या सीक्वलमध्ये सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या त्रिकुटाची उपस्थिती असणार की नाही हे येणाऱ्या काही दिवसात समजेल.

हेही वाचा :

  1. Jawan Box Office Collection day 8 : 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर छापत आहे नोटा....
  2. Aamir Khan And Junaid Khan : आमिरचा मुलगा जुनैद खान झळकणार साऊथ अभिनेत्री साई पल्लवीसोबत...
  3. Hbd Ayushmann Khurrana: 'ड्रीम गर्ल 2'मध्ये पूजा बनून आयुष्मान खुरानानं जिंकली लोकांची मनं; वाचा आजच्या या बर्थडे बॉयची रियल कहाणी...

ABOUT THE AUTHOR

...view details