मुंबई - Akshay kumar : अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान पुन्हा एकदा पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी एकत्र आले आहेत. बॉलिवूडच्या या तिन्ही स्टार्सनी यापूर्वी पान मसाल्याची जाहिरात केली होती. त्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं होतं. दरम्यान आता सध्या त्यांच्या नवीन जाहिरातीला देखील खूप ट्रोल करण्यात आलं आहे. अक्षय व्यतिरिक्त अजय देवगण आणि शाहरुख खानला देखील अनेकांनी खडेबोल सुनाविले आहेत. ही जाहिरात प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीन्स बनविण्यात आले आहेत. काहीजणांनी तर अक्षय कुमारचे चित्रपट पाहण्यास बंद करा असं देखील म्हणत आहेत. या जाहिरातीवरील लोकांचा संताप पाहून अक्षय कुमारने मोठे पाऊल उचलले आहे. प्रचंड टीका झाल्यानंतर अक्षय कुमारनं या पान मसाला कंपनीसोबतचा करार तोडला आहे.
अक्षय कुमारची पान मसाला जाहिरात : यावेळी जाहिरातीत शाहरुख खान आणि अजय देवगण अक्षय कुमारच्या घराबाहेर कारमध्ये त्याची वाट पाहत असल्याचं दिसतं. अनेकदा हे दोघेही अक्षयला हाक मारतात, मात्र तरीही तो येत नाही. तेव्हा शाहरुख खान टेनिस बॉल फेकून घराच्या काचेवर मारतो. हा टेनिस बॉल सौंदर्या शर्माच्या घरातील खिडकीला लागतो. त्यानंतर ती बाहेर येते आणि त्यांना या कृत्यासाठी रागवायला लागते. तेव्हा शाहरुख हा यासाठी अजय देवगण दोषी असल्याचं सांगतो. नंतर अजय हा पान मसाला खातो. त्यानंतर हवेत केसरचा सुगंध दरवळतो. अचानकच सौंदर्या ही त्यांना रागवण बंद करते आणि या सुगंधद्वारे अक्षय कुमार हा घराबाहेर येतो, असं जाहिरातीत दाखविण्यात आलं आहे.