मुंबई : मणिपूरमध्ये सुरू झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना घडत आहेl, ज्यामुळे आता मानवता संपेल असे दृष्य दिसत आहे. काही लोक आजकाल जनावरासारखी वागत आहेl. दरम्यान आता मणिपूरमधून माणुसकीला लाजवेल असा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोन महिलांची नग्न परेड काढली जात आहे. ही घटना अतिशय निराशाजनक आहे. या घटनेचा निषेध हा संपूर्ण भारतात होत आहे.
अक्षय कुमार आणि उर्मिला मातोंडकर केला संताप व्यक्त : या घटनेचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला. त्यानंतर आता बॉलिवूडमधून देखील या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. मणिपूरमधून समोर आलेल्या या व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने प्रतिक्रिया देत ट्वीटमध्ये लिहले, 'मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून मी हादरलो आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा असे भयंकर कृत्य करण्याचा विचारही कोणीही करणार नाही, अशी मी आशा करतो,' असे त्याने पोस्टवर म्हटले. त्यानंतर प्रकरणी उर्मिला मातोंडकरनेही आपल्या ट्विटरवर लिहिले की, मणिपूरमधील व्हिडिओ पाहून मी हैराण आणि भयभीत झाले आहे. हा प्रकार मे महिन्यात घडला असून त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे तिने म्हटले.