मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार केवळ त्याच्या चित्रपटांमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही कॉमेडी आणि मस्तीसाठी ओळखला जातो. अक्षय कुमार शूटिंग सेट आणि प्रमोशनल इव्हेंट्समध्ये मजा केल्याशिवाय राहत नाही याची पुष्टीही अनेक स्टार्सनी केली आहे. आता अक्षय कुमारने स्वतः सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
अक्षय कुमारने शेअर केलेला व्हिडिओ रस्त्यातला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंग दिसत आहे. अक्षय आणि रकुल चालत जात असताना रस्त्यात मध्ये पाणी साठल्याचे दिसते. अक्षय यातून मार्ग काढण्यासाठी प्रियकरासारखा पुढे सरसावतो आणि विटा शोधून त्यावरुन चालण्यासा रकुलला सांगतो. रकुल जेव्हा पाण्याच्या मध्यभागी पोहोचते तेव्हा अक्षय कुमार तिला माईंड गेमखेळण्यास भाग पाडतो. एकंदरीतच अक्षयची ही रील खूप मजेशीर आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अक्षयने लिहिलंय, हा पूर्णपणे एक मजेशीर खेळ आहे. एक माईंड गेम, तुम्हीही असाच ट्विस्ट असलेला मजेशीर व्हिडिओ आपल्या साथियासोबत बनवा आणि मग आम्ही त्यापैकी एक शेअर करू.