मुंबई - Celebs Reaction on Uttarkashi Rescue: उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना 17व्या दिवशी सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. हे सर्व कामगार 12 नोव्हेंबरपासून बोगद्यात अडकले होते. या बचावकार्यात अनेक आव्हानं आली. सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी बचाव पथकाचं कौतुक केले आहे. अभिनेता अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, युवराज सिंग, कंगना रणौत, निमृत कौर, रितेश देशमुख, जॅकी श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आभार मानले आहे. अक्षय कुमारनं बोगद्यातून परतणाऱ्या मजुरांचा फोटो शेअर करताना 'X'वर लिहिलं, 'अडकलेल्या 41 मजुरांना वाचवल्याबद्दल मला आनंद आणि दिलासा मिळाला आहे. बचाव पथकातील प्रत्येक सदस्याला माझा सलाम. तुम्ही सर्वांनी मिळून खूप छान काम केले आहे. हा नवा भारत आहे आणि याबद्दल आपल्या सर्वांना अभिमान वाटतो. जय हिंद.'
- अभिषेक बच्चनने दिली प्रतिक्रिया : अभिषेक बच्चननं ट्विट करत बचावकार्यात सहभागी असलेल्या सर्वजणांचे कौतुक केलं आहे. त्यानं एक पोस्ट शेअर करून लिहिलं, 'उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या आमच्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी सर्व बचाव कर्मचार्यांना आणि सर्व एजन्सींना सलाम. जय हिंद.'
- युवराज सिंगने दिली प्रतिक्रिया :भारताचा माजी क्रिकेटपटूयुवराजनं सोशल मीडियावर लिहिलं, 'धाडसी मजुरांना वाचवण्यात यश आले आहे. गेल्या 17 दिवसांचे कठीण आव्हान आता संपले आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी मनापासून प्रार्थना करतो. बचाव पथकाला त्यांच्या अतुलनीय प्रयत्नांसाठी सलाम'.
- कंगना रणौत मानले आभार : कंगना रणौतनं गेल्या मंगळवारी उत्तरकाशी बोगद्याचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये काही वृद्ध महिला यशस्वी बचावासाठी देवाकडे प्रार्थना करत असताना दिसत होत्या. शेअर केलेल्या फोटोत कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं होतं की, 'रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी. सर्वत्र शिव.' याशिवाय संगीतकार सोफी चौधरीनं बचाव पथकाचे काही फोटो शेअर करून बचाव पथक आणि 41 मजुरांचे कौतुक केले आहे.
- निम्रत कौरनं शेअर केली पोस्ट : अभिनेत्री निम्रत कौरनेही एक्सवर उत्तरकाशी बचाव पथकाचे कौतुक करत लिहिलं, 'एजन्सी - एनडीआरएफ, आर्मी, इंजिनीअर्स, रॅट होल मायनर्स यांनी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी सर्व अडकलेल्या मजुरांना वाचवल्याबद्दल खूप आभार आणि सलाम. शेवटी, देवाच्या कृपेने, मला खूप आनंद मिळाला'. याशिवाय अडकलेल्या मजुरांची सुटका करणाऱ्या 22 एजन्सींना अभिनेता रितेश देशमुख आणि जॅकी श्रॉफनं बचाव पथकातील सदस्यांचे कौतुक केले आहे. बोगद्यातून बाहेर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कार्यकर्त्यांशी फोनवर बोलून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. उत्तराखंड सरकारने या सर्व 41 मजुरांच्या कुटुंबीयांना 1 लाख रुपये देण्याची घोषणाही केली आहे.